शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२५ हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

पक्षीनिरीक्षणादरम्यान २५ हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. तलावावरील बंधाऱ्याच्या मातीच्या रस्त्यांवर छोटा तपकिरी होला आपले खाद्य शोधत होता. सकाळच्या न्याहारीची सुरूवात वेड्या राघूने ड्रॅगनफ्लाय पकडून केलेली दिसली. सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेणारा कंठवाला होला तारेवर बसला होता.

ठळक मुद्देपक्षीसप्ताह निमित्त रोठा तलावावर पक्षी निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पक्षी सप्ताह ५ ते १२ नोव्हेंबर यादरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. पक्षी निरीक्षण, संवर्धन यासंबंधी विविध उपक्रमांचे आयोजन विविध संस्थेद्वारा केल्या जात आहे. पक्षी, वन्यजीव व निसर्गाचे संरक्षण व संवर्धनात अग्रेसर असलेल्या बहार नेचर फाऊंडेशनच्यावतीने पाचव्या दिवशी रोठा क्रमांक २ या तलावावर पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.पक्षीनिरीक्षणादरम्यान २५ हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. तलावावरील बंधाऱ्याच्या मातीच्या रस्त्यांवर छोटा तपकिरी होला आपले खाद्य शोधत होता. सकाळच्या न्याहारीची सुरूवात वेड्या राघूने ड्रॅगनफ्लाय पकडून केलेली दिसली. सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेणारा कंठवाला होला तारेवर बसला होता. फार दूरून राखी तित्तिराचा आवाज ऐकू येत होता. लालबुड्या बुलबुल उगाच एका झाडावरून दुसºया झाडावर उडत होता. छोटा कंठेरी चिखल्या आपल्या जोडीदारासोबत तलावाजवळील चिखलात भक्ष शोधण्यात मग्न होता व यांच्यासोबत होती टीपकेवाली तुतारी. इतरत्र सामान्य तुतारीही होत्याच. मध्यम बगळा तलावाच्या काठावर अर्धवट पाय बुडतील इतक्या खोल पाण्यात भक्षांच्या शोधात फिरत होता व गाय बगळेही तलावाच्या काठावर दिसले. शिकारी पक्षी शिक्रा एका वाळलेल्या झाडावर भक्षाचा अंदाज घेत होता. पण त्याला कोतवाल पक्ष्यांच्या जोडीने हल्ला चढवत तिथून खदडून लावले. परिसरातील धोका टळला असे मानत कोतवाल जोडीने पुन्हा त्यांच्या घरट्या जवळील झाडांवर विसावा घेतला. शिक्रा आता तलावातील दुसºया किनाºयावर आपल्या आवाजाने उपस्थिती दर्शवित होता. सतत आवाज करणाऱ्या टिटव्यांनी त्याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली होती. हळदीकुंकू बदक आकाशात उडत असतांना पक्षी निरीक्षक आपल्या कॅमेरात त्याला टिपत होते. दरम्यान स्थलांतरित बदकांचा थवा नजरेस पडला. पक्षी निरीक्षणासाठी बहार नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर वानखेडे, वन्यजीव अभ्यासक पराग दांडगे, वैभव देशमुख, पक्षी अभ्यासक राहुल वकारे, राजदीप राठोड व सुरभी विप्लव, दिपक गुढेकर, डॉ. सुप्रिया दांडगे, राजेंद्र लांबट, पार्थ वीरखडे, दीपक व देवाशिष साळवे, गजानन बर्वे, मोहन व राजस हांडे, पंकज वानखेडे, जिगीषा दांडगे, मिस्टी राठोड उपस्थित होते.

टॅग्स :environmentपर्यावरण