शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

२३ हजार ५०० ज्येष्ठांची स्मार्ट कार्डकरिता नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील काही आगारात स्मार्ट कार्ड काढताना ज्येष्ठांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अमूक कागदपत्रे, तमूक कागदपत्रे आणण्याबाबत वेळेवर सांगितले जात आहे. त्यामुळे ज्येष्ठांना एकाच कामाकरिता वारंवार येरझारा कराव्या लागत आहेत. बोगस प्रवाशांना अटकाव व्हावा या हेतूने एसटी महामंडळाने ही योजना अंमलात आणली आहे.

ठळक मुद्देवर्धा विभागांतर्गत स्थिती। नोंदणीसाठी केवळ तीन दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना सवलत हवी असल्यास काही महिन्यांपूर्वी स्मार्ट कार्ड बंधनकारक केले. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १ जानेवारीपासून स्मार्ट कार्ड नसल्यास एसटीतून प्रवास करताना ज्येष्ठांना मिळणारी सवलत बंद होणार आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड काढण्याकरिता ज्येष्ठांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. वर्धा विभागांतर्गत ज्येष्ठांनी २३ हजार ५०० स्मार्ट कार्ड मिळविले आहेत.जिल्ह्यातील काही आगारात स्मार्ट कार्ड काढताना ज्येष्ठांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अमूक कागदपत्रे, तमूक कागदपत्रे आणण्याबाबत वेळेवर सांगितले जात आहे. त्यामुळे ज्येष्ठांना एकाच कामाकरिता वारंवार येरझारा कराव्या लागत आहेत. बोगस प्रवाशांना अटकाव व्हावा या हेतूने एसटी महामंडळाने ही योजना अंमलात आणली आहे. यात खऱ्या लाभार्थ्यांनाच त्रासाचा सामना करावा लागत आहे. वर्धा विभागांतर्गत वर्धा, आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्या. पंत.), पुलगाव हे आगार आहेत. अल्प मुदत असल्याने स्मार्ट कार्ड मिळावे याकरिता यातील अनेक आगारांत ज्येष्ठ नागरिक ताटकळताना दिसून येतात. काही आगारात अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सौजन्याची वागणूक मिळत नसल्याचीही ज्येष्ठ नागरिकांची तक्रार आहे.प्रवासावर येणार मर्यादायापूर्वी एसटीतून प्रवास करताना सवलतीकरिता किलोमीटरचे बंधन नव्हते. १ जानेवारीपासून मात्र, स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने आता किलोमीटरचेही बंधन असणार आहे. आता एका वर्षात केवळ ४ हजार किलोमीटर प्रवासासाठी सवलत देण्याचा निर्णय परिवहन महामंडळानग घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता ४ हजार किलोमीटरपुढील प्रवास सवलतीत करता येणार नाही. एसटीच्या नव्या स्मार्ट कार्ड अंमलबजावणीनंतर हा निर्णय लागू होणार असल्याचे समजते. ज्येष्ठ नागरिकांना सद्यस्थितीत निमआराम बसमध्ये ५० टक्के, शिवशाहीमध्ये ४५ आणि शिवशाही स्लीपरमध्ये ३० टक्के सवलत दिली जाते. सवलतीमुळे ज्येष्ठ नागरिकांचा एसटीकडे मोठ्या प्रमाणात कल आहे. मात्र, ४ हजार किलोमीटरच्या प्रवासाच्या मर्यादेमुळे प्रवासी संख्या घटण्याची शक्यता आहे. यामुळे एसटीची प्रवासी संख्या आणि उत्पन्नावरही परिणाम होणार आहे.

टॅग्स :state transportएसटी