शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

खत देण्यास महिला मजुरांकडून दिला जातोय नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

हल्ली मुले-मुली खत द्यायचे काम सांभाळत आहे. यासाठी फारच फार १०० रू. खर्च यायचा; पण आता २०० रू. प्रती बॅग मजुरी घेत असल्यामुळे खत देण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर बॅग प्रमाणे मजुरी असल्यामुळे खतेही वाजवीपेक्षा जास्त लागत आहेत. कारण जास्तीत जास्त बॅग टाकायचा मजुरांचा प्रयत्न असतो. जिथे ५ बॅगचा अंदाज असला तेथे सहा ते सात बॅग लागतात. हाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

ठळक मुद्देमुला-मुलींनी खत द्यायचा मोर्चा सांभाळला : मजुरी २०० रूपये प्रतिबॅग, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : दिवसागणिक शेतीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. यातच सततची नापिकी आणि अस्मानी व सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचा पिच्छाच पुरविला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जगणेच अवघड झाले आहे. रोहिणी नक्षत्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात कपाशी पिकांची चिकणीसह परिसरातील शेतशिवारात लागवड करण्यात आली. कपाशीचे बियाणे अंकुरले असून रोपटे जमिनीच्या वर आलेत. यामुळे डवरणी सह खत देण्याच्या कामाला वेग दिला जात आहे.शुक्रवारी व मंगळवारला चिकणीसह पढेगाव, जामणी, निमगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकरी कपाशी पिकाला खत द्यायच्या कामाला गती देत आहेत. मात्र, महिला मजूर खत द्यायच्या कामाला नकार देत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.हल्ली मुले-मुली खत द्यायचे काम सांभाळत आहे. यासाठी फारच फार १०० रू. खर्च यायचा; पण आता २०० रू. प्रती बॅग मजुरी घेत असल्यामुळे खत देण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर बॅग प्रमाणे मजुरी असल्यामुळे खतेही वाजवीपेक्षा जास्त लागत आहेत. कारण जास्तीत जास्त बॅग टाकायचा मजुरांचा प्रयत्न असतो. जिथे ५ बॅगचा अंदाज असला तेथे सहा ते सात बॅग लागतात. हाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.खत द्यायच्या कामाला महिला मजूर नकार देत असल्यामुळे ना इलाजास्तव मुलांना बॅग प्रमाणे खत द्यायला सांगावे लागते. विशेष म्हणजे शेतीच्या कामात वेळेला फार महत्व असते. वेळेचे काम वेळीच करावे लागते. तरच शेतीत उत्पन्न होण्याची शक्यता असते.- अतुल घोडे, युवा शेतकरी, चिकणी.शेतीची कामे आली ठेकापद्धतीवरपुर्वी शेतीची सर्रास कामे ही रोजनदारीनेच केल्या जायची. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असायचा. पण गेल्या चार-पाच वर्षामध्ये शेतीकामे ही घडाळीच्या तासाप्रमाणे झाले आहेत. तर काही कामे ठेक्याप्रमाणे. खत देणे बॅग प्रमाणे, औषध फवारणी पंपा प्रमाणे, तर निंदन तासाप्रमाणे, निंदन करणाऱ्या मजुरांचे तास या प्रमाणे असतात. सकाळी ७ ते ९, ८ ते ९, १० ते ३, ११ ते ५ असे ठरले असते.

टॅग्स :agricultureशेती