शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्या वेतनातून रकमेची कपात

By admin | Updated: June 6, 2014 00:08 IST

स्थानिक महाराणाप्रताप वॉर्डातील प्रकाश वानखेडे हे पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक या पदावर कार्यरत असताना अफरातफरी प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

न्यायालयाचा निर्देश धुडकावला : अफतरातफरप्रकरणआर्वी : स्थानिक महाराणाप्रताप वॉर्डातील प्रकाश वानखेडे हे पंचायत समिती अंतर्गत  ग्रामसेवक या पदावर कार्यरत असताना अफरातफरी प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. प्रकरण न्यायप्रविष्ट केले. आर्वीत व वर्धा न्यायालयाचा निकाल वानखेडे यांच्या बाजुने लागला. त्यांना निर्दोष ठरविण्यात आले.  तरीही अफरातफर प्रकरणात त्यांच्या सेवानवृत्ती प्रकरणातून १८ हजार १0७ रूपये कपात केले. यासाठी २00३ पासून जि. प. वर्धा कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे, मात्र अद्यापही त्यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळाला नसल्याची माहिती समोर आली.प्राप्त माहितीनुसार, आर्वी पं.स. अंतर्गत येत असलेल्या विरूळ ग्रामपंचायतीमध्ये प्रकाश वानखेडे हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. एका अफरातफर प्रकरणात त्यांना निलंबित करून त्यांना पुन्हा सेवेते घेण्यात आले. याप्रकरणी आर्वी व वर्धा न्यायालय ८ ऑक्टोबर १९९८ च्या एका निकालात त्यांना सदर प्रकरणात निर्दोष ठरविण्यात आले. त्यावेळी त्यांनी न्यायालयीन निकालाच्याप्रती जि. प. वर्धा यांना सादर करुन शासनाकडे पुर्ववत कामावर घेण्याबाबत विनंती अर्ज करून न्याय मागितला. त्यावेळी शासनाने वानखेडे यांच्या सर्व कागदपत्रांची शाहनिशा करून ग्रामविकास  व जलसंधारण विभागाने त्यांना शासन आदेश क.डीईएन ३६९३ प्र.क्र. ६५, २३ मार्च २00१ आदेश पारीत करून पुन्हा सेवेत घेतले. आर्वी व वर्धा न्यायालयाने वानखेडे यांना निर्दोष ठरवूनही जि.प.ने त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली. त्यानंतर ते सेवानवृत्त झाल्यानंतर त्यांच्यास सेवानवृत्तीच्या रक्कमेतून १८ हजारांची रक्कम कपात करण्यात आली. हा अन्याय दूर करण्यासाठी  गेल्या अकरा वर्षापासून जि. प. कार्यालयातील संबंधित अधिकार्‍यांशी प्रत्यक्ष भेट व पत्रव्यवहार करीत आहे. अनेकदा त्यांनी भेटी देऊन आपली व्यथा सांगितली. मात्र कोणीही ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नाही. अद्याप न्याय मिळाली नसली तरी कार्यालयाचे उंबरठे झिजविणे मात्र थांबलेले नाही. माहितीच्या अधिकारात वानखेडे यांनी माहिती मागितली असता वानखेडे यांना तुम्हाला कोणत्या न्यायालयाने निर्दोष ठरविले याची माहिती मागितली. दि. २६ नोव्हेंबर १३ ला उपमुख्य कार्यपालन अधिकार्‍यांची  वानखेडे यांनी प्रत्यक्ष भेट घेवून संपूर्ण आवश्यक कागदपत्रे तसेच आर्वी व वर्धा न्यायालयाच्या निकालाच्या प्रती दिल्या.  संबंधितांनी यावर त्वरीत कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर फेब्रुवारी १४ मध्ये संबंधितांची भेट घेवून प्रकरण मार्गी लावण्याची विनंती केली, परंतु काहीएक उपयोग झाला नाही. सेवेत असताना महत्त्व असते मात्र सेवानवृत्तीनंतर शासकीय कर्मचार्‍यालाच या बिकट परिस्थितीला सामारे जावे लागत असल्याचा प्रत्यय त्यांना आला.(तालुका प्रतिनिधी)