वृत्तपत्र वाचनाने कोरोना होतो,हा गैरसमजच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:00 AM2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:37+5:30

वृत्तपत्र हे लोकांपर्यंत विविध विषयांचे ज्ञान पोहोचण्याचे कार्य मागील अनेक वर्षांपासून प्रभावीपणे करीत आहे. आपल्या आजूबाजूला घडलेली घटना असो की जगात सध्या नेमके काय सुरू आहे याबाबतची खरी माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच नागरिकांना मिळते. विशेष म्हणजे विविध ज्ञान मिळविण्याचे एक महत्त्वाचे साधन वृत्तपत्र आहे. जगभरात कोरोना थैमान घालत असला तरी वृत्तपत्राचे वाचन सुरू आहे.

Reading a newspaper makes you corona , this is a misunderstanding! | वृत्तपत्र वाचनाने कोरोना होतो,हा गैरसमजच!

वृत्तपत्र वाचनाने कोरोना होतो,हा गैरसमजच!

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. मोहन सुटे : वेळोवेळी अचूक माहिती देण्याचे कार्य वृत्तपत्र करते

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : वृत्तपत्रांना हात लावल्याने किंवा वृत्तपत्र वाचनाने कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढतो, हे कसलाही आधार नसलेली अफवा आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. एवढेच नव्हे तर डॉक्टर लहाने यांनीही सोशल मीडियावर या संबंधात माहिती प्रसारित केली आहे. त्यामुळे वृत्तपत्रापासून कोरोना होतो हा मोठा गैरसमज आहे, असे मत आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी लोकमतशी बोलताना मांडले.
वृत्तपत्र हे लोकांपर्यंत विविध विषयांचे ज्ञान पोहोचण्याचे कार्य मागील अनेक वर्षांपासून प्रभावीपणे करीत आहे. आपल्या आजूबाजूला घडलेली घटना असो की जगात सध्या नेमके काय सुरू आहे याबाबतची खरी माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच नागरिकांना मिळते. विशेष म्हणजे विविध ज्ञान मिळविण्याचे एक महत्त्वाचे साधन वृत्तपत्र आहे. जगभरात कोरोना थैमान घालत असला तरी वृत्तपत्राचे वाचन सुरू आहे. कुठे काय घडले? नेमके काय आहे? याची अचूक माहिती वर्तमानपत्रातून मिळत असते. सोशल मीडियावरून मिळणारी माहिती ही खरी असतेच असे नाही. वर्तमानपत्र वाचले नाही, तर अनेकांना चहाचा घोट जात नाही. सवयीमुळे दिवसभर त्यांना काही विसरल्या सारखे होते. वृत्तपत्र वाचनादरम्यान कोरोनाची भीती बाळगणे निरर्थक आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली तर ते कोरोनामुक्त राहू शकतात. खबरदारीचा उपाय म्हणून आर्वीत अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केली जात आहे. या विशेष मोहिमेला नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सूटे यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव विविध माध्यमातून होत असतो. मात्र, वृत्तपत्राद्वारे कोरोनाचा विषाणू पसरत नाही. वृत्तपत्राद्वारे विविध विषयाची माहिती नागरिकांना मिळते. सध्याच्या कोरोना संंकटाच्या काळातही खरी माहिती वृत्तपत्र नागरिकांसह वाचनांना देत असल्याचे डॉ. सुटे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Reading a newspaper makes you corona , this is a misunderstanding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.