लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलविण्याचा निर्णय होताच त्यावर शनिवारपासून अंमल करण्यात येत आहे. वर्धेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नवा गणवेश देण्यात आला.सेवाग्राम मार्गावरील एमआयडीसी परिसरात असलेल्या महामंडळाच्या विभागीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय नियंत्रक राजेश आडोकर यांनी उपस्थिती होती.रापमच्या कर्मचाºयांना नवीन गणवेश वितरण सोहळा व लोकोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला महामंडळातील कर्मचारी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक, चालक, वाहक महिला वाहक, यांत्रिक, आर्ट ए, आर्ट सी, शिपाई इत्यादी २१ कामगारांना नवीन गणवेश वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय नियंत्रक राजेश अडोकार यांनी रापम तर्फे देण्यात येणाºया सुखसोई व सवलतीबाबत कर्मचाºयांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे निलेश देशमुख यांनीही विचार व्यक्त केले. नवीन गणवेश वितरण सोहळा कार्यक्रमास विभागीय वरिष्ठ सांख्यिकी देवपूजारी, सर्व अधिकारी, तसेच संघटनेचे पदाधिकारी, विभागीय पातळीवरील व आगार पातळीवरील तसेच सर्व आगारातील चालक, वाहक, यांत्रिक व इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
रापमचे कर्मचारी नव्या गणवेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:51 IST
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलविण्याचा निर्णय होताच त्यावर शनिवारपासून अंमल करण्यात येत आहे. वर्धेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नवा गणवेश देण्यात आला.
रापमचे कर्मचारी नव्या गणवेशात
ठळक मुद्दे२१ कर्मचाऱ्यांना अतिथींच्या हस्ते वितरण : नव्या योजनांचीही दिली माहिती