शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंच्या मदतीसाठी सरसावल्या रणरागिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे मजूर वर्ग कामावर जाऊ शकत नसल्याने हातावर पोट असणारे, दिव्यांग, निराधार नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. सामाजिक दायित्व म्हणून शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील महिलांनी शासनाची कुठलीही मदत न घेता स्वत:च्या परिचयांना एकत्र करून त्यांच्याकडून धान्यसाठा व इतर साहित्य आणि पैसे गोळा करून या संकटकाळात सापडलेल्या गरजूंसाठी त्यांनी भोजनदान प्रकल्प सुरू केला आहे.

ठळक मुद्देभोजनदानातून दातृत्त्व : प्रेरणादायी उपक्रम, २0 दिवसांपासून पुरविताहेत अन्नधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सर्वसामान्य कुटूंबातील समाजकार्याचे व्रत स्वीकारलेल्या महिलांं मागील २० दिवसांपासून विविध परिसरातील गरजूंना भोजनदान करीत प्रेरणादायी उपक्रम राबवित आहे.लॉकडाऊनमुळे मजूर वर्ग कामावर जाऊ शकत नसल्याने हातावर पोट असणारे, दिव्यांग, निराधार नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. सामाजिक दायित्व म्हणून शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील महिलांनी शासनाची कुठलीही मदत न घेता स्वत:च्या परिचयांना एकत्र करून त्यांच्याकडून धान्यसाठा व इतर साहित्य आणि पैसे गोळा करून या संकटकाळात सापडलेल्या गरजूंसाठी त्यांनी भोजनदान प्रकल्प सुरू केला आहे. मास्टर कॉलनी येथील समन्वयक बुद्ध विहार जवळ सीमा राष्ट्रपाल मेश्राम यांच्या घरी मागील वीस दिवसांपासून दररोज ४०० ते ५०० व्यक्तींकरीता जेवण तयार केले जात आहे. हे जेवण संत कबीर काजी वॉर्ड, फुले वॉर्ड, खंडोबा वॉर्ड, गौतम वॉर्ड आदी ठिकाणी दररोज सकाळी ते दुपारी दोन वाजेपर्यंत गरजूंना वाटप करण्यात येत आहे. तर गरजू, वृद्ध व दिव्यांगांना त्यांच्या घरपोच जेवणाचे पाकिट पोहचविले जात आहे.यासाठी मंडळाच्या सीमा मेश्राम, शिला बोरकर, निर्मला भोंगाडे, यमुना गायकवाड, जयश्री देवगडे, लीना फुलझेले, गीता गाठले, शबा सय्यद, सुमन सहारे, कल्पना शेंडे, मनीषा खेळकर, रजनी जमगडे, सुजाता सहारे, मोना फुलझेले, राजश्री बांबोडे, शुभांगी पाटील, शारदा पाटील, वीणा पाटील, अश्विनी मेंढळकर, राशी मेश्राम, श्रेया देवगडे, सहर्षा बोरकर आदींसह प्रत्येक वॉर्डातील स्वयंसेवक, कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळत आहे. रणरागिणींच्या या कार्याला नागरिकांनी सलाम केला असून त्यांना गावातील नागरिकांकडूनही दाद मिळत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक