शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा द्या

By admin | Updated: June 8, 2014 00:07 IST

ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याकरिता वरीष्ठांनी याकडे लक्ष देत सुविधा प्रदान कराव्या, अशी मागणी आधारवड ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराच्या

वर्धा : ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याकरिता वरीष्ठांनी याकडे लक्ष देत सुविधा प्रदान कराव्या, अशी मागणी आधारवड ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराच्या प्रतिनिधी मंडळाने केली. या मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यांना देण्यात आले. तसेच आरोग्य सेवेबाबत नागरिकांना येणार्‍या समस्या  व तक्रारी निवारण करण्याबाबतचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला. निवेदनानुसार, सामान य रुग्णालयात गर्भवती महिला व वृद्ध नागरिक यांना प्रदान करण्यात येत असलेल्या रुग्णसेवेबाबत सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त शल्य  चिकित्सक  डॉ.  नवृत्ती बी. राठोड यांच्यासोबत शिष्टमंडळाने या विषयांवर चर्चा केली.  यात रुग्णालयातील रक्त नमुना संकलन केंद्र हे तळमजल्यावर असावे, कारण गर्भवती मातांना तपासणीकरिता व अन्य रुग्णांना तपासणी करण्याकरिता वर खाली चढावे लागते, तरी सदर केंद्र हे तळमजल्यावर आणण्यात यावे. ‘आयुष’ उपचार केंद्राबाबतची माहिती व हे केंद्र नेमके कुठे आहे, तिथवर जाण्याचा मार्ग हा फारच अवघड आणि धोक्याचा असल्याने योग्य  उपाययोजना करण्यात यावी.  रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना बसण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना ताटकळत उभे राहावे लागते. यावर त्वरित कार्यवाही व्हावी.  यानंतर या विषयावर ज्येष्ठ  नागरिकांशी चर्चा करताना डॉ. राठोड यांनी ज्येष्ठ नागरिकांना  रुग्णालयातील सर्व  विभागात नेऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. तसेच तक्रारीचे वास्तव समजून घेतल. प्रतिनिधी मंडळाला सहकार्य करुन समस्यांचे निवारण त्वरित पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले.यावेळी त्यांनी रुग्णालयातील सुरू झालेले डायलिसीस चे नवे युनिट तसेच कमी खर्चात व मोफत असलेल्या सुविधांचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन केले.आधारवड  परिवाराचे अध्यक्ष शामकांत देशपांडे  यांनी सामान्य व गोरगरीब जनतेला मानवीय आधार व सेवाभाव वृत्तीने रुग्णसेवा मिळावी अशी मागणी केली. सामान्य रुग्णालयाला शासनाकडून सोयी सवलती पुरविण्याकरिता व अतिरिक्त मोकळी जागा तसेच ईमारत बांधकामाकरिता संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधून निधी उपलब्ध करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.यावेळी शिष्टमंडळात उपाध्यक्ष मोहन वाघ,  सचिव प्रल्हाद गिरीपुंजे, वसंत खानखोज, कामगार नेते गुणवंत डकरे, रत्नाकर चरडे, सुभाष देशमुख, गोपाळ राऊत, डॉ. सुधाकर भुरे, रमेश खुरगे, माधव गोमासे इत्यादी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या मागण्यांवर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली.(स्थानिक प्रतिनिधी)