शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेती उत्पादित मालाला दीडपट भाव निर्धारित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST

वस्तूंची अधिकतम विक्री किंमत शासनाने निर्धारित करून त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी लोकमत व्यासपीठावर केली. शेतकरी शेतामध्ये जे उत्पन्न घेतात, त्याकरिता खते, बियाणे, कीटकनाशके, रसायने यांचा वापर करतात, मशागत करतात यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात; मात्र शेतमालाची किंमत शासन निर्धारित करते.

ठळक मुद्देअग्निहोत्री : पंतप्रधानांशी पत्रव्यवहार

वर्धा : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कारखानदारी वस्तूंची अधिकतम विक्री किंमत निर्मिती मूल्यापेक्षा अधिकतम विक्री किंमत कितीतरी पटीने जास्त असते. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही. किरकोळ व्यापारी एमआरपीनुसारच वस्तूंची विक्री करतात. त्यामुळे सर्वसामान्याची खूप लूट होत असून महागाई वाढतच आहे. त्यामुळे वस्तूंची अधिकतम विक्री किंमत शासनाने निर्धारित करून त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी लोकमत व्यासपीठावर केली.शेतकरी शेतामध्ये जे उत्पन्न घेतात, त्याकरिता खते, बियाणे, कीटकनाशके, रसायने यांचा वापर करतात, मशागत करतात यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात; मात्र शेतमालाची किंमत शासन निर्धारित करते. ती अतिशय कमी म्हणजे उत्पादन किमतीपेक्षाही कमी असते.त्यामुळे शेतीकरिता लागलेला खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट व गंभीर होते. जर कारखानदारी उत्पादन वस्तूंवर जास्तीत जास्त विक्री किंमत (एम.आर.पी.) नमूद असते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पादित वस्तूंवर (एल.आर.पी.) जीवन जगण्याएवढी विक्री किंमत शासनाने निर्धारित करावी.शेतकºयांनी उत्पादित केलेल्या वस्तूंवर उत्पादन खर्च अधिक ५० टक्के जीवन जगण्याएवढ्या श्रमाची किंमत (एल.आर.पी.) निर्धारित केल्यास त्याला जीवन जगण्याएवढे उत्पन्न शेतीतून प्राप्त होऊ शकते. यामुळे तो आत्महत्येसारखे पाऊल उचलणार नाही, असे अग्निहोत्री म्हणाले.या मुद्यांकडे शासनाने लक्ष द्यावेशासनाने आवश्यक उपाययोजना म्हणून सर्व वस्तूंच्या उत्पादन किमतीबाबतची संपूर्ण माहिती घेऊन त्या वस्तूंची अधिकतम विक्री किंमत ठरवावी, म्हणजे वस्तूंच्या किंमती आपोआपच कमी होईल. परिणामी महागाई कमी होईल आणि जनसामान्याचे जीवन सुखमय होईल, असे पत्र नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविल्याचेही व्यासपीठावर बोलताना शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी