शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जयंतीनिमित्त जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

महात्मा गांधींच्या आश्रमात परंपरागत गांधी जयंती साजरी होणार आहे. आश्रमात या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मोठ्या संख्येने नागरिक येतात. यासाठी आश्रमही सज्ज झाला असून काही कामे आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत. पावसाळा ओसरला की गांधी जयंती येते. सर्व स्मारके माती, लाकूड, बोरे, बांबू आदींपासून बनविण्यात आलेली आहे. परिसर प्रकारच्या फुलझाडांनी नटलेला आहे. संपूर्ण परिसरात बद्री अंथरलेली आहे.

ठळक मुद्देरंगरंगोटीला वेग : २ ऑक्टोबरला आश्रमात उसळणार जनसागर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महात्मा गांधींच्या आश्रमात परंपरागत गांधी जयंती साजरी होणार आहे. आश्रमात या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मोठ्या संख्येने नागरिक येतात. यासाठी आश्रमही सज्ज झाला असून काही कामे आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत.पावसाळा ओसरला की गांधी जयंती येते. सर्व स्मारके माती, लाकूड, बोरे, बांबू आदींपासून बनविण्यात आलेली आहे. परिसर प्रकारच्या फुलझाडांनी नटलेला आहे. संपूर्ण परिसरात बद्री अंथरलेली आहे.मातीची लिपाई, सारवण, गवत काढणे, बल्ली, बांबू, लाकूड आदींना तेल-पाणी, विटांना गेरू, झाडांना पिवळी माती आणि गेरू अशी कामे जयंतीपूर्वी केली जातात. जवळपास सर्वच कामे झालेली असून काही अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येत आहे. या कामांमुळे वातावरणात व आश्रमाच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे. तयारी होत असली तरी पावसाचा धोकाही अधिक आहे. त्यामुळे पहिल्यांदा सारवण होऊनही झांज्या व झापड्याा काढण्यात आलेल्या नाहीत.सप्टेंबर महिना संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. हस्ती नक्षत्र सुरू आहे. जोरदार पावसाची शक्यता असल्याने झांज्या व झापड्या काढण्यात आलेल्या नाही. आश्रमात गांधीजींची जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते.यंदा या दिवशी राष्ट्रपित्याला १५० व्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात येणार आहे. आश्रमात शाळा, महाविद्यालय, संस्था, सामाजिक संघटना, गांधीवादी, अभ्यासक आदी कार्यकर्ते आश्रमातील कार्यक्रमात भाग घेतात. यातून बापूंचा विचार व कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे.गांधी जयंती पर्वावर कन्याकुमारी ते जम्मू काश्मिर यात्रामहात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीचे १५० वर्ष आहे. तसेच आचार्य विनोबा भावे यांचे १२५ वे जयंती वर्ष असून महामानवांचा विचार व कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केरळ येथील पाच युवकांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मिर अशी मोटरसायकल यात्रा काढून आपली आदरांजली वाहणार आहे. शुक्रवारला यात्रेकरूंनी सेवाग्राम आश्रमला भेट दिली. २१ सप्टेंबर रोजी या यात्रेला प्रारंभ झाला. तीन हजार किमीचा प्रवास सेवाग्राममध्ये पूर्ण झाला आहे. सेंटर फाँर लाईफ लर्निंग या संघटने अंतर्गत ही यात्रा असल्याचे यात्रा प्रमुख अशोक यांनी सांगितले. पुढे जय जगतचा नारा पण आम्ही बुलंद करणार आहोत. एकता परिषदचे पी.वी.राजगोपाल विश्व शांती पदयात्रा काढणार असून गांधीजींच्या जयंती दिनी राजघाट नयी दिल्ली येथून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. यात आम्ही दोन दिवस सहभागी होणार आहोत.त्यानंतर ४ आॅक्टोबरला पुढील प्रवास सुरू होणार असल्याचेही अशोक यांनी सांगितले. सेवाग्राम येथील आश्रमात दोन दिवस मुक्काम केला असून त्यांनी आश्रमाच्या प्रार्थनेत सहभाग नोंदविला. स्मारक आणि आश्रमचा इतिहास जाणून घेतला तसेच दैनंदिन कार्य समजावून घेतले. या यात्रेत अशोक सह प्रसाद, विष्णू, यदू व संजू या पाच युवकांचा समावेश आहे. अशोक व प्रसाद हे नोकरी करतात तर बाकी तीन महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक