शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य द्या

By admin | Updated: May 3, 2016 02:39 IST

जिल्हा लोकशाही दिनात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीसंदर्भात प्राधान्याने निर्णय घेऊन तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीची

वर्धा : जिल्हा लोकशाही दिनात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीसंदर्भात प्राधान्याने निर्णय घेऊन तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीची माहिती तात्काळ उपलब्ध करून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्यात.
जिल्हा लोकशाही दिनात सोमवारी जिल्ह्यातून आलेल्या आठ नवीन तक्रारी व दहा जुन्या अशा एकूण १८ तक्रारींची दखल घेण्यात आली. यावेळी प्रत्येक तक्रारदारांनी त्यांचे गाऱ्हाणे मांडले. निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी प्रत्येक तक्रारी संदर्भात माहिती घेऊन संबंधित विभागांना जनतेच्या तक्रारीवर प्राधान्याने निर्णय घेण्याच्या सूचना केल्यात.
बोरगाव पुनर्वसन येथील विनोद महादेव कदम यांनी खासगी सावकाराकडून ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह कर्जाची माफी योजनेंतर्गत मिळावी यासाठी अर्ज केला. तालुकास्तरीय समितीने यावर तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात.
ग्रामीण भागातील शेतीची मोजणी न झाल्यामुळे बांदबंदीस्तीची कामे खोळंबली. इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळावा तसेच वैयक्तिक अडचणी तक्रारदारांनी आपल्या तक्रारी आज दाखल केल्यात. यामध्ये वर्ध्याच्या रामनगर येथील वामन उर्फ बाबा नाईक, भारत गोपाळ अलोनी (वरूड), वामन गोमासे, आंजी (मो.), जमनाबाई नाईक (रोहणा), मोनीबाबा निफाटे (पिंपळखुटा), केशव नामदेव बुराडे (वाघोली), कवडेश्वर बोबडे (हिंगणघाट), वसंत ढोबे (वर्धा) अशा आठ नवीनसह जुन्या १० तक्रारीवर कार्यवाही करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, उपवनसंरक्षक पगार, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता देशपांडे, महसूल उपविभागीय अधिकारी, नाबार्डच्या स्रेहल बन्सोड तसेच विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)