शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

‘विद्रोही’च्या सभामंडपात प्रीतीसंगम...

By गजानन चोपडे | Published: February 05, 2023 2:49 PM

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांपेक्षा केवळ जेवणाच्या मेन्यूवरच मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी भर दिल्याचा घणाघाती आरोपही विद्रोही संमेलनाच्या मंचावर करण्यात आला.

कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरी (वर्धा) : ज्या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर सडकून टीका करण्यात आली, त्या संमेलनाच्या साहित्यनगरीला भेट देत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी वैचारिक प्रगल्भतेचा परिचय दिला. 

 फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांपेक्षा केवळ जेवणाच्या मेन्यूवरच मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी भर दिल्याचा घणाघाती आरोपही विद्रोही संमेलनाच्या मंचावर करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संमेलनाला हजेरी लावणाऱ्या साहित्यिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, अचानक दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि डॉ. अभय बंग यांनी थेट ‘विद्रोही’चा सभामंडप गाठला. या दोन्ही ज्येष्ठ साहित्यिकांना बघून आयोजकांना आश्चर्याचा धक्का बसला. दोघांचाही यावेळी सूतमाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तिकीट लागतेय बावा... संमेलनाकडे रसिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. वर्धेकरांचीही तोकडीच उपस्थिती दिसून येत आहे. वर्धेत स्वावलंबी मैदानावर दरवर्षी, लॉयन्स क्लबतर्फे अनेक कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमाला प्रवेशासाठी तिकीट आकारले जाते. त्यामुळे साहित्य संमेलनालाही तिकीट असल्याची धारणा वर्धेकरांची झाली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या दिवशीही साहित्य रसिकांची व श्रोत्यांची गर्दी संमेलनात दिसून आली नाही. शाळकरी मुलांना आणून संमेलनाची शोभा वाढविण्याचा प्रयत्न आयोजकांना करावा लागला. 

दुपारचे जेवण अन् परिसंवादात वामकुक्षी बहुतांश परिसंवादात श्रोत्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. त्यातच दुपारच्या जेवणानंतर काहीजण आसनांवरच वामकुक्षी घेत असल्याचे चित्र दिसून आले. परिसंवादापूर्वी वक्त्यांचा परिचय आणि स्वागत एवढे लांबले की उपस्थितांपैकी अनेकांनी सभा मंडपाबाहेर जाणे पसंत केले. काही माध्यम प्रतिनिधी वगळता परिसंवाद ऐकणारे फार कमी होते. त्यामुळे वक्त्यांचा जोशही कमी दिसून आला. 

भारुकाकांचे उपोषण विद्यार्थ्याची आत्महत्या रोखण्यासाठी आणि  त्यांना नवी प्रेरणा देण्यासाठी महेंद्र गौरीशंकर बैसाणे यांनी ‘भारूकाकाची पत्रे’ हे पुस्तक लिहिले आहे.  हे पुस्तक पालकांसह विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता शासनाने प्रयत्न करावे, यासाठी भारुकाकांची धडपड सुरू आहे. त्यांनी माजी संमेलनाध्यक्षांसह शासनाकडेही पाठपुरावा केला; पण त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर त्यांनी साडेचार महिन्यांपासून आत्मक्लेश सुरू केला आहे. संमेलनस्थळीच सध्या आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनliteratureसाहित्य