शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

श्वापदांमुळे शेतकऱ्यांची तारांबळ

By admin | Updated: July 21, 2014 00:19 IST

परिसरातील बहुतांश शेतीचा भाग हा जंगलव्याप्त आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना श्वापदापासून पिकांचे रक्षण करताना त्रास सहन करावा लागतो. पिंपळखुटा, गुमगाव, तरोडा, किन्हाळा, बोथली,

पिंपळखुटा : परिसरातील बहुतांश शेतीचा भाग हा जंगलव्याप्त आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना श्वापदापासून पिकांचे रक्षण करताना त्रास सहन करावा लागतो. पिंपळखुटा, गुमगाव, तरोडा, किन्हाळा, बोथली, चांदणी, दाणापूर व तळेगाव आदी गावांचा समावेश आहे. येथील शेतकऱ्यांनी वनविभागाला निवेदन देऊन या श्वापदांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे; मात्र याकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे.येथील शेती निसर्गावर अवलंबून आहे. ओलिताची साधने उपलब्ध नाहीत. केवळ दोन टक्के शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे. कोरडवाहु शेतीचा भाग असल्याने उत्पन्नही मर्यादित आहे. यातही जंगली जनावरे उदरनिर्वाहाकरिता शेतीकडे येतात. पिकांची नासाडी करतात. यामुळे शेतकऱ्यांना जंगली श्वापदापासून पिकांच्या रक्षणार्थ कसरत करावी लागत आहे. जंगलाचा भाग गाव व शेताला लागून असल्याने दिवसभर रोही, डुकरे व हरीण तसेच देवगायी आदी जनावरांचा मुक्तसंचार असतो. बहुतेक गावात पाझर तलाव असल्याने जंगली जनावरे त्या ठिकाणी वास्तव्य करतात तर कधी गावाचा आधार घेतात. वन्यपशु कायदा असल्याने शेतकऱ्यांना प्राण्यांची हत्या करणे शक्य नाही. तसे केल्यास कठोर कारवाईस सामोरे जावे लागते. पिकांचे जनावरांचे रक्षण करताना श्वापदांना कोणतीही शारीरिक इजा होवू नये यांची दक्षता घ्यावी लागते.पेरणी झाली त्या दिवसापासून तर संपूर्ण पीक घरी येईपर्यंत पिकांची रखवाली करावी लागते. प्रत्येक शेतकरी रात्री शेतात जागली करतो. रात्रीला शेतात जंगली जनावरे येवू नये याकरिता प्रत्येक शेतकऱ्यास वर्षाकाठी २० हजार रुपये खर्च येतो. तरी पण जनावरे शेतात घुसून उभ्या पिकांचे फार मोठे नुकसान करीत आहे. दरवर्षी सरासरी २५ टक्के उत्पन्न जंगली श्वापदे फस्त करतात. मात्र याची कोणतीच नुकसान भरपाई मिळत नाही. या जनावरांपासून पिकांचे रक्षण करताना शेतकऱ्याची दमछाक होते. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेती करणे तोट्याचे ठरत आहे. वन्यप्राणी पिकांची वाढच होऊ देत नाही. तुरीचे पीक तर कापणीला येण्याआधीच फस्त केले जाते. यावर्षी पावसाने दगा दिल्याने पेरणी उशीरा सुरू झाली. पेरणी होताच डुकरांनी पेरलेल्या तुरी खाणे सुरू केले असून तुरीची दुबार व तिबार पेरणी करावी लागत आहे. तर पऱ्हाटी रोही खाऊन फस्त करीत आहे. ही समस्या आजची नसून पुर्ववत चालत आली आहे. लोकप्रतिनिधी याचा गांभिर्याने विचार करीत नाही.वनविभाग शेतकऱ्यांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाने तातडीने या समस्येला निकाली काढण्याकरिता वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांना उपाययोजना म्हणून तारेचे कुंपण करून देण्याकरिता शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर)