शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

निम्न वर्धा प्रकल्पाच्या कामाची पोलखोल

By admin | Updated: May 16, 2017 01:12 IST

निम्न वर्धा प्रकल्पावर आतापर्यंत २०८३.६३ कोटी खर्च झाले. अधिकाधिक मुख्य कालव्याचे काम पूर्ण होवून ....

जनमंचची सिंचन शोधयात्रा : २०८३.६३ कोटी खर्चूनही शेतकऱ्यांना लाभ नाहीफनिन्द्र रघाटाटे। लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : निम्न वर्धा प्रकल्पावर आतापर्यंत २०८३.६३ कोटी खर्च झाले. अधिकाधिक मुख्य कालव्याचे काम पूर्ण होवून २०१७ अखेर २४६७४ हेक्टर शेतजमिनीत सिंचन क्षमता निर्माण झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. ही संपूर्ण माहिती खोटी असल्याचे जनमंचच्यावतीने रविवारी आयोजित सिंचन शोध मोहिमेत पुढे आले. या मोहीम राज्य जनमंचचे बाबुजी अणे, आर. के. समितीचे वेद व भारतीय किसान संस्थेने आयोजित केली होती. यामुळे प्रकल्पावरील अभियंत्यांनी कागदोपत्री सादर केलेल्या कामाची शेतकऱ्यांसमोर पोलखोल झाली. सिंचन शोधयात्रेच्या निमित्ताने प्रारंभी धनोडी विश्राम गृहावर अधिकारी, जनमंचचे पदाधिकारी परिसरातील शेतकऱ्यांची बैठक झाली. त्या सभेत कॅनलचे कार्यकारी अभियंता डी.जी. रब्बेवार, मायनरचे उपविभागीय अभियंता नरेंद्र निमजे, कार्यकारी अभियंता मंडवार यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. त्यानुसार सदर प्रकल्पाची प्रथम प्रशासकीय मानयता ९ जानेवारी १९८१ रोजी मिळाली असून त्यावेळी या प्रकल्पाचा खर्च फक्त ४८.०८५ कोटी एवढा होता. प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्याने सदर प्रकल्पाच्या कामाला १० जानेवारी २००० रोजी ४४४.५२१ कोटीच्या खर्चाची सुधारित प्रथम प्रशासकीय मान्यता २९ आॅगस्ट २००६ रोजी ९५०.७ कोटी खर्चाला द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता असे करीत पाच वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळारली. यानंतर आता सन २०१६-१७ मध्ये प्रकल्पाची किंमत ३६१५.२९ कोटी झाली आहे. सदर प्रकल्पावर मार्च २०१७ अखेर २०८३.९३ कोटी खर्च झाल्याची माहिती दिली. या खर्चातून ४४.४२५ किलोमिटर लांबीचा मुरूम टाकण्याचे संपूर्ण काम झाले. ६१.३० कि़मी.चे शाखा कालवे (मायनर) झाल्याचेही सांगितले. या कामामुळे आर्वी तालुक्यातील १,२२१ हेक्टर, देवळी तालुक्यातील ३२,०३५ हेक्टर, वर्धा तालुक्यातील ११,२७७ हेक्टर व हिंगणघाट तालुक्यातील ८,००६ हेक्टर अशी एकूण ५२,५३९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पावर सन २०११-१२ च्या रबी हंगामापासून प्रत्यक्ष सिंचनास सुरुवात करण्यात आली असून आजमितीस २१,५५२ हेक्टर सिंचन करणे शक्य झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती किती खरी आहे, याचा प्रत्यक्ष पडताळा घेण्यासाठी जनमंचचे व इतर संस्थेचे पदाधिकारी, आदिवासी, शेतकरी यांनी प्रकल्पाचा मुख्य कालवा, मायनर, पाटचऱ्या झालेले सिंचन, धरणाच्या भिंतीमुळे त्या भागात निर्माण झालेल्या समस्या यांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी अंती मुख्य कालवाच्या ४७५ मीटर लांबीला लायनिंग केलेले नसल्याचे दिसून आले. परिणामी पाणी पाझरत आहे. मायनरची अवस्था अत्यंत दयनिय असून सर्व कामे १० वर्षापूर्वी झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी त्यांच्या किनारी (बँक) भूईसपाट झाल्या आहेत. मारयनरला उतार नसल्याने पाणी पुढे सरकण्याऐवजी जागोजागी फुटून परिसरातील अनेक शेतात साचत असल्याचे दिसून आले. वडगाव (पांडे) या गावपरिसरात तर उपकालव्यांनी आलेले पाणी रस्त्यावर साचत असल्याने गावातील शेतकऱ्यांना दळणवळणाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे शेतकरी रमेश चिखले यांनी सांगितले. या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्यात कॅनलची वस्तूस्थिती लक्षात आली तर शेतकऱ्यांनी सदर पाण्यामुळे फायदा कमी अन् नुकसान अधिक, अशी व्यथा व्यक्त केली. या कालव्यातून सोडलेले ६० टक्के पाणी वाया जात असून केवळ ४० टक्के पाणी सिंचनासाठी कामी येते. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान निर्माण झालेल्या प्रश्नावर अधिकारी आता दोन वर्षात उपकालवे स्वच्छ करू, पाटचऱ्या काठ व उर्वरित सर्व कामे करू असे थातूरमातूर उत्तरे देत होते. या मोहिमेत परिसरातील शेतकऱ्यांसह जनमंचचे पदाधिकारी उपस्थित होते.