शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

शेतात जबरदस्तीने केली नांगरणी

By admin | Updated: May 21, 2016 02:14 IST

येथील सर्व्हे नं. ३१२ आराजी ०.४० आर या शेतजमीनीचा १९७० पासूनचा ताबा संजय गणपत हिवसे व त्यांच कुटुंबियाकडे होता.

शेतकऱ्याचे ठाणेदार व तहसीलदारांना साकडेआकोली : येथील सर्व्हे नं. ३१२ आराजी ०.४० आर या शेतजमीनीचा १९७० पासूनचा ताबा संजय गणपत हिवसे व त्यांच कुटुंबियाकडे होता. या शेतीवर दीपक भांडेकर रा. जामनी याने सदर शेतीवर जबरदस्तीने नांगरणी करून कब्जा केल्याची तक्रार हिवसे यांनी ठाणेदार व तहसीलदार यांच्याकडे केली आहे. संजय हिवसे याच्याकडे गत ४५ वर्षांपासून सदर शेतीचा कब्जा आहे. सदर शेतीवर पीक घेत तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तलाठी प्रमाणपत्राचे आधारे त्याला भूदान यज्ञ मंडळ, नागपूर यांनी भूदान पट्टा क्र. ४२८/१२ जावक क्र. १२४३/१२ दि. १४ जून २०१२ रोजी भूमापण क्र. ३१२ आराजी ०.४२ भूदान पट्टा प्रदान केला. भूदान धारकाच्या नावाची नोंद या जमिनीच्या राजस्व रेकॉर्डमध्ये घ्यावी व सुधारित ७/१२ द्यावा, असे पत्र राजस्व विभागाला देण्यात आले आहे. मध्यंतरी भूदान पट्ट्यांबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे भूदान पट्टा नावे झाला नसल्याचे व फेरफार प्रकरणी वरिष्ठ निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. ४५ वर्षांपासून ताब्यात असलेल्या या शेतीवर भांडेकर यांनी एकाएकी कब्जा केल्यामुळे हा शेतकरी गोंधळून गेला आहे. तहसीलदार व ठाणेदार यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)