शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

श्री मुनी सुव्रतनाथ विधानासाठी राज्यातून जैन श्रावकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST

विधान महोत्सवासाठी जैन श्रावक, श्राविका, उपासिका यांची मोठी गर्दी उसळली असून राज्याच्या काना- कोपºयातून तेसच प्रदेशाच्या पांढुरणा, प्रभात पट्टण, मुलताई, आमला बैतुल, चिंचोली, भेसदेही या भागातून जैन श्रावकांनी आपली उपस्थिती लावली आहे. विधान महोत्सवात प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता आचार्य श्री राष्ट्रभक्तीपर विशेष प्रवचन करणार असून जिनालयाच्या शिलान्यासासाठी जवळपास २५ फूट उंच कुर्मशिला सकाळी ११ वाजता उभारल्या जाणार आहे.

ठळक मुद्देप्रजासत्ताकदिनी आचार्य सुवीर साक्षरजी महाराज करणार प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : जैनधर्माचे २० वे तीर्थकर भगवान श्री मुनी सव्रतनाथ यांचे जिनालय पुलगावात साईधाम परिसरासमोरील मैदानात साकरल्या जाणार आहे. जैन मंदिर ट्रस्टच्यावतीने विधान महोत्सवात २५ रोजी दुसऱ्या दिवशी अभिषेक, नित्य पूजन, आहार चर्चा, गुरुभक्ती, मंगलवाद्य आदींसह मुनी सुव्रतनाथ विधान या महापुजेचे आयोजन मांगलिक वातावरणात पार पडले.विधान महोत्सवासाठी जैन श्रावक, श्राविका, उपासिका यांची मोठी गर्दी उसळली असून राज्याच्या काना- कोपºयातून तेसच प्रदेशाच्या पांढुरणा, प्रभात पट्टण, मुलताई, आमला बैतुल, चिंचोली, भेसदेही या भागातून जैन श्रावकांनी आपली उपस्थिती लावली आहे. विधान महोत्सवात प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता आचार्य श्री राष्ट्रभक्तीपर विशेष प्रवचन करणार असून जिनालयाच्या शिलान्यासासाठी जवळपास २५ फूट उंच कुर्मशिला सकाळी ११ वाजता उभारल्या जाणार आहे. सौधर्म इंद्र कुबेर इंद्र विधान नायक व श्रेष्ठ इंद्र यासह २१ इंद्र इंद्राणींनी सकाळी जिनेंद्राभिषेक केला तर सुलू विजय चानेकर व अंकुश जीतेंद्र सोईतकर यांच्याहस्ते भगवान पार्श्वनाथ प्रभुंच्या प्रतिमेवर अभिषेक करण्यात आला. दुपारी १२ ते ५ पर्यंत पूजा विधान सायंकाळी आनंद यात्रा, गुरुभक्ती, आरती करण्यात आली. सायंकाळच्या सांस्कृतिक संध्या कार्यक्रमात २१ इंद्र, इंद्राणीसह आयोजिलेला इंद्र दरबार जैन समाज बांधवांना मोहित करुन गेला. या महोत्सवाचे प्रतिष्ठाचार्य पंडित संजय ‘सरस’ व संगीत संचातून भक्तीधारा प्रवाहित करणारे पं. संदीप दौड उपस्थितांना मंगल सुमधूर सुरांची मेजवानी देत आहे. या त्रिदिवसीय विधानासाठी ट्रस्टचे विश्वस्त सागर बदनोरे, किशोर बदनोरे, पंकज पोहरे, निखील बदनोरे, अमित बदनोरे, रोहन बदनोरे, विवेक सावळकर, राहुल काळे, जय गुलालकर, पुनम धोपाडे, संगीता शहाकार, सारिका पोहरे, पल्लवी बदनोरे, दिपीका बदनोरे, पुजा हणमंते, स्रेहा पोहरे यांचेसह जैन बंधु भगिनींचे सहकार्य लाभत आहे.