शहरातील नंदोरी मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर सध्या जड वाहतूक वाढत आहे. या जड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून ही वातूक बंद करण्याची मागणी या भागातील नागरिकांना आ. समीर कुणावार यांच्याकडे केली आहे. ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचऱ्यांच्या मागण्या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात शुक्रवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी रिक्त पदाच्या घोळावर चर्चा झाली. ...
शेतमालाचे उत्पादन कमी व त्यांचे बाजारभावही कमी असताना सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल. हा संपूर्ण प्रकार म्हणजे केंद्र व राज्य सरकारची एक लोणकढी थाप असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी केले. ...
जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्या तत्काळ निकाली काढण्याच्या मागणीचे निवेदन बांधकाम कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने आ. डॉ. पंकज भोयर यांना देण्यात आले. यावेळी आ. भोयर यांनी बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्च ...
शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले अनेक पांदण रस्ते गत वर्षी मोकळे केले आहेत. २०१७ मध्ये २५ टक्के शेतकऱ्यांचा वाटा घेत मागेल त्याला पांदण रस्ता असा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन ५० किमी पर्यंतचे पांदण रस्ते सुस्थितीत केले आहेत. ...
शेतकऱ्यांना सिंचनाकरिता थ्री-फेजचा विद्युत पुरवठा केला जातो. शेतातील विहिरींवर, बोअरवर कृषी पंप लावून शेतकरी पिकांचे ओलित करतात. सध्याच्या स्थितीत अनेक आर्थिक अडचणी येत असल्याने शेतकºयांना वीज देयक अदा करणे शक्य नसते. ...
गांधींजींनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कृतीशील अर्थशास्त्राची मांडणी करणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचे विचार, त्यांचे अर्थशास्त्र जगाला माहिती व्हावे म्हणून ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. ...
चिकित्साशास्त्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातून संपादित केलेले ज्ञान, संशोधनकार्य आणि व्यवसाय या माध्यमातून केवळ आर्थिक लाभ मिळविणे, एवढाच आपला मर्यादित उद्देश नसावा. ...
नगर परिषदेच्या कारभाराची माहिती बालपणापासून मिळावी या उद्देशाने नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी एक दिवसाचा बालनगराध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतची लेखी परीक्षा नुकतीच पार पडली. ...
शहरात दोन वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेले ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक नागपूर यांनी राज्य शासनाला पाठविला आहे. वास्तविक, सर्व कागदोपत्री दिसून येत आहे. यंत्रसामुग्री नाही, डॉक्टर नाही, औषध नाही, सर्व सुविधा नाहीच. ...