पढेगाव सेलसुरा डांबरी रस्त्याच्या कडा खचल्याने वाहतुकीस व वहिवाट करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांनी केली आहे. ...
शासनाच्या सफाई कामगार, वंचितांकरिता अनेक कल्याणकारी योजना आहेत. मात्र, त्या केवळ शासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या कामचुकार धोरणामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे अधिकाºयांच्या डोक्यातील घाण साफ करण्याची शासनाला सद्बुद्धी द्यावी, असे परखड ...
शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याच्या दृष्टीने स्कूल बसेस योग्य आहेत अथवा नाहीत याविषयी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी अभियान राबविले. दरम्यान, ४८४ वाहनांची तपासणी करण्यात आली होती. ...
चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याने आता पवनार या गावालाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. एकाच रात्री पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न करीत मोठ्या प्रमाणात तोडफोड करुन धुडगूस घातला. चोरट्यांच्या हातात फारसे काही लागले नसले तरी एकाच दिवशी पाच ठिकाणी झालेल्या ...
समुद्रपूर तालुक्यातील शिवणी आणि हिंगणघाट तालुक्यातील धोची हे दोन्ही वाळू घाट वादाच्या भोवऱ्यात सापडले. शिवणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर पिस्टल रोखल्याच्या कारणावरुन तो घाट तत्काळ रद्द केला. पण, धोची घाटावर चाकूहल्ला झाल्यानंतरही घाट रद्दची ...
मागील काही दिवसांमध्ये पावसाने कोल्हापूर, सांगली भागात अक्षरश: थैमान घातले आणि कष्टाने उभे केलेले संसार क्षणात होत्याचे नव्हते झाले. या महापुरात सांगली, कोल्हापूर येथे अनेक संसार ध्वस्त झालेत. होत नव्हतं सगळं या पुरात वाहून गेलं. कित्येकांना आपले प्र ...
शिवणफळ गावातील दोन रोहित्र मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने पाणीपुरवठा योजनेला फटका बसला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गावठाणाच्या रोहित्रावरून वीस कृषी पंप आणि नळयोजना सध्या कार्यान्वित असून एकाच रोहित्रावर अधिक विद्युत दाब येत असल्याने निम्मे ग ...
एकेकाळी प्रसिद्धीस आलेल्या पुलगावच्या गणेशोत्सवात सध्या काही प्रमाणात उदासीनता असली तरीही सार्वजनिक गणेशोत्सवाचे सातत्य अजूनही कायम आहे. शहरामध्ये साधारणत: १५ सार्वजनिक मंडळे असून जवळपास सात हजार घरगुती गणरायाची स्थापना केली जाते. ...
शहरात नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियंत्रणाखाली अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. या कामाकरिता सिमेंटचे पक्के रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्यात आल्याने सुरुवातीपासून ही योजना वादग्रस्त ठरली. ...