मार्केटचे काम तर निकृष्ट केलेच मात्र दुकानदारांनी गाळ्यात दुकाने सुरू केल्यावर लोखंडी शटर लावणे व उघडणे दिव्य संकट झाले आहे. अशी संतप्त भावना तेथील दुकानदारांनी व्यक्त केली. शहरातील रस्ते, नाल्या याचे बांधकाम निकृष्ठ झाल्याने त्याची चौकशी व्हावी यासा ...
शहरात नाचणगाव तसेच कॅम्प रोड असे दोन मोठे रस्ते असून नाचणगाव रोडवर शाळा कॉलेज, असून विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते. कॅम्प रोडवर कोर्ट, बसस्थानक, रूग्णालय असल्याने दिवसभर वर्दळ असते. स्टेशन चौकात पोलिसांचा चेकपोस्ट आहे. परंतु, या चौकात कधीच वाहतूक ...
अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर अशक्य गोष्टदेखील शक्य करता येते, याचा प्रत्यय पढेगाव येथे कुणाल इंद्रपाल टेकाम याने हस्तकलेतून साकारलेल्या पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तीतून येतो. दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेला कुणाल रोजमजुरी करीत असून फावल्या वेळेत भावविश ...
येळाकेळी येथे उभ्या असलेल्या डंपरची बॅटरी चोरीला गेली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीला गजाआड केले. वसंता रामाजी पवार (४५) व मयूर अरविंद चापडे (२४) दोघेही रा. येळाकेळी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ...
तंत्रज्ञानाचे हे युग असून याचा उपयोग ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानामुळे आज औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने बदल झाले आहेत. स्मार्टफोनने विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रात क्रांतीच केली आहे. एकट्या भारतात ४०० मिलियन स्मार्टफोन वापर ...
शाळेची नवी इमारत ५५२ लक्ष रूपयांतून साकारण्यात येणार आहे. आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात झालेले हे सर्वात पवित्र काम आहे. याचा आपल्याला आनंद आहे, असे प्रतिपादन आर्वीचे नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी केले. ...
जून महिन्यात उशीरा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड उशीरा केली. त्यातच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन आदी पीक अडचणीत आले आहे. यंदा कपाशीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, अजूनही कपाशीच्या झाडाला बोंड ...
आंदोलनाच्या मंचावरून ईव्हीएम तज्ज्ञ व शास्त्रज्ञ हरिप्रसाद, अनुपम सराफ, रमेश बेलमकोंडा, राहुल मेहता, निरंजन टकले यांनी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटच्या वापरातून कशाप्रकारे भारतीय जनतेच्या मतांची चोरी केली जाते, हे सप्रमाण दाखवून दिले आहे. ...
आर्वी आणि वर्धा तालुक्याच्या सिमेवर कुऱ्हा धरण आहे. सध्या ते १०० टक्के भरले असून मागील आठवड्यात याच धरणाच्या भिंतीला तडा गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर वर्धा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी या धरणाची ...
डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना न.प. चा आरोग्य विभागाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. डेंग्यूला आळा घालण्यासाठी या परिसरात तातडीने धूरळणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...