Do you provide safe shelter, shelter? | सुरक्षित निवारा देता का, निवारा?
सुरक्षित निवारा देता का, निवारा?

ठळक मुद्देबाऱ्हा सोनेगाववासीयांचा सवाल : धरणफुटीच्या भीतीने घर सोडले

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवसभर शेतात राबून थकलेले बाऱ्हा सोनेगाव येथील नागरिकांनासह चिमुकल्यांना सध्या रात्र शेतात पाल टोकून तयार केलेल्या झोपडीत काढावी लागत आहे. बाऱ्हा सोनेगाव नजीकच्या कुऱ्हा धरणाच्या भिंतीला तडा गेल्याने सध्या या गावातील नागरिकांच्या मनात धरणफुटीबाबत कमालीची भीती आहे. सदर ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या मागणीकडे जिल्हा प्रशासनाकडून अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांकडून सध्या ‘सुरक्षीत निवारा देता का हो निवारा’ अशी मागणी होत आहे.
आर्वी आणि वर्धा तालुक्याच्या सिमेवर कुऱ्हा धरण आहे. सध्या ते १०० टक्के भरले असून मागील आठवड्यात याच धरणाच्या भिंतीला तडा गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर वर्धा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी या धरणाची पाहणी केली होती. शिवाय तेथील नागरिकांशी संवादही साधला होता. इतकेच नव्हे तर महसूल विभागाने दक्षता म्हणून याच गावातील ४७ कुटुंबातील एकूण १४७ जणांना रसुलाबाद येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात हलविले होते. तर यापूर्वीही बाऱ्हा सोनेगाव येथील ग्रामस्थांना पुराच्या धोक्यामुळे अनेकदा सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले होते. वारंवार पुराचा धोका राहत असल्याने बाऱ्हा सोनेगाव या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याचे दिसून येते. तर सध्या या गावातील नागरिकांना धरणफुटीच्या भीतीमुळे मोठा धोका पत्कारून शेतात पाल टोकून त्याच झोपडीत रात्र काढावी लागत आहे.

सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका
बाºहा सोनेगाव येथील नागरिक सध्या धरणफुटीच्या भीतीमुळे शेतातील झोपड्यांमध्ये कंदीलांच्या सहाय्याने रात्र काढत आहेत. इतकेच नव्हे तर ज्या परिसरात ते रात्र काढत आहेत. त्या परिसरातील सरपटणाºया प्राण्यांचा वावर असून हा धोका सध्या पत्कारत आहेत.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक फटका
बाºहा सोनेगाव येथील शाळकरी मुल-मुली रसुलाबाद व वर्धा येथे शिक्षणासाठी येतात. इतकेच नव्हे तर शाळा व महाविद्यालयात शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर ते गावाची वाट धरतात. परंतु, सध्या त्यांना काळोखातच रात्र काढावी लागत असल्याने त्यांचा गृहपाठ पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.


Web Title: Do you provide safe shelter, shelter?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.