राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ओजस्वी करणार महाराष्ट्राचे नेतृत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 13:41 IST2021-09-22T13:37:35+5:302021-09-22T13:41:14+5:30

वर्धेची ओजस्वी साळवे हिची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेकरता महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा १ ते ३ ऑक्टोबर या काळात झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे होणार आहे.

ojasvi salwe presenting maharashtra in national archery competition held in jamshedpur | राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ओजस्वी करणार महाराष्ट्राचे नेतृत्त्व

राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ओजस्वी करणार महाराष्ट्राचे नेतृत्त्व

ठळक मुद्देज्युनिअर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे केले होते प्रतिनिधित्व

वर्धा : राष्ट्रीय धनुर्विद्या वरिष्ठ स्पर्धेकरिता ओजस्वी उदय साळवे हिची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघात निवड झालेली ओजस्वी ही राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणार आहे.

औरंगाबाद येथील भारतीय खेळ प्राधिकरण येथे १६ ते १८ सप्टेंबर या काळात राज्यस्तरीय वरिष्ठ धनुर्विद्या निवड चाचणी पार पडली. यात ओजस्वीने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तिची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा १ ते ३ ऑक्टोबर या काळात झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे होणार आहे. याआधी तिने देहरादून येथे ज्युनिअर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 

ओजस्वी सध्या नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या क्रिडा अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.  तिचे वडील जि.प. आरोग्य विभागात कार्यरत असून आई प्रतिभा या इसापूर येथील जि.प. शाळेत शिक्षक आहे. सध्या सर्व स्तरावरून ओजस्वीचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Web Title: ojasvi salwe presenting maharashtra in national archery competition held in jamshedpur