शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

जखमीला घेवून गावकरी उपवनसंरक्षक कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 1:07 AM

धामणगाव (वाठोडा) शिवारात सोमाजी कासार यांच्यावर रानडुकराने हल्ला चढविला.

रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: धामणगाव (वाठोडा) शिवारात सोमाजी कासार यांच्यावर रानडुकराने हल्ला चढविला. त्याला शासकीय मदत मिळत नसल्याने गावकऱ्यांनी त्यांना थेट उपवनसंरक्षक कार्यालयात आणले. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार सोमवारी सकाळी घडला.शेतकरी सोमाजी कासार हे सोमवारी शेतात बकऱ्या चारत असताना त्यांच्यावर झुडपात लपून असलेल्या रानडुकराने अचानक हल्ला केला. यात सोमाजी कासार गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी थेट मालवाहू वाहनात ठेऊन या भागातील वन्य प्राण्यांच्या हैदोसाचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी उपवनसंरक्षक कार्यालय गाठले. जखमीला घेऊन काही नागरिक उपवनसंरक्षक कार्यालयात आल्याची माहिती मिळताच वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. बन्सोड यांनी कार्यालयात येऊन ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. या समस्येवर मार्ग काढण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून मार्ग निघाल्याने जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.अधिकाऱ्यांनी दिला माणुसकीचा परिचयरानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकरी सोमाजी कासार यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याचे लक्षात येताच वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. बन्सोड यांनी माणुुसकीचा परिचय देत तात्काळ स्वत: जवळील २ हजार रुपये जखमीच्या उपचाराकरिता कर्मचाऱ्यांच्या हाताने रुग्णालयात पाठविले. जखमीला लवकरात लवकर शासकीय मदत देण्यात येईल, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.