शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

आता बोगस नंबरप्लेट ठरतेय पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 5:00 AM

गेल्या काही महिन्यांपासून शहरात बोगस नंबरप्लेट वापरून शेकडो वाहने धावत आहेत. चोरटे वाहनचोरी केल्यानंतर त्याची मूळ नंबर प्लेट फेकून देतात. त्यावर बोगस अथवा अन्य वाहनांचा नंबर टाकतात. ओळखीचे मॅकेनिक किंवा नातेवाइकांच्या माध्यमातून अर्ध्यापेक्षा कमी किमतीत विक्री करतात. ती चोरीची वाहने शहरात बिनधास्त धावतात. यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांच्या संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देवाहतूक विभागासमोर आव्हान : चोरीच्या वाहनांवर बंधन येणार कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरासह जिल्ह्यात बनावट नंबरप्लेट लावून गुन्हे करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. त्यामुळे येत्या काळात वाहतूक पोलिसांना हेल्मेट आणि ड्रायव्हिंग लायसन्स तपासून दंड आकारण्याबरोबरच आता बनावट नंबरप्लेट लावून गुन्हेगारी करणाऱ्यांवरही करडी नजर ठेवावी लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात बोगस नंबरप्लेट वापरून शेकडो वाहने धावत आहेत. चोरटे वाहनचोरी केल्यानंतर त्याची मूळ नंबर प्लेट फेकून देतात. त्यावर बोगस अथवा अन्य वाहनांचा नंबर टाकतात. ओळखीचे मॅकेनिक किंवा नातेवाइकांच्या माध्यमातून अर्ध्यापेक्षा कमी किमतीत विक्री करतात. ती चोरीची वाहने शहरात बिनधास्त धावतात. यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांच्या संख्या अधिक आहे. विशेषत: पल्सर गाडीच्या चोरीमध्ये वाढ झाली असून याचा वापर सोनसाखळी चोर आणि लूटमार करणारे आरोपी करतात. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी हिसकावून तसेच लूटमारीच्या घटना घडल्या असून, यामध्ये दुचाकीचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. अनेक ठिकाणी पोलिसांना गुन्ह्यात चोरीच्या दुचाकीचा वापर झाल्याचेही तपासात पुढे आले आहे. त्यामुळे बोगस नंबरप्लेट पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. 

अनेकांना असते फायनान्स कंपनीची भीती...

अनेक जण फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून वाहने घेतात. व्यवसाय चांगला सुरू असेल तर कर्जाचे हप्ते फेडतात. व्यवसाय डबघाईस आल्यास कर्ज फेडणे मुश्किल होते. अशावेळी कर्जाचे हप्ते रखडले तर फायनान्स कंपन्या वाहन उचलून नेतात. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या कचाट्यातून वाचविण्यासाठी किंवा कंपनीला गोंधळात टाकण्यासाठी अशी कृप्ती वापरल्या जात असल्याची माहिती आहे.

मूळ मालक त्रस्तनियम तोडल्यावर पोलिसांनी वाहनाचा फोटो काढला तरी दंडाची पावती मूळ वाहन क्रमांकाच्या मालकाच्या घरी पोहचत आहे. त्यामुळे बनावट क्रमांकाच्या वाहनांचे फावत आहे. मूळ मालक दंडाची पावती घेऊन वाहतूक शाखेत येतात. आणि ते वाहन आपले नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आणतात. पोलीस पडताळणी करून चालान रद्द करतात.

वाहनचालकांवर कारवाई करताना जर बनावट नंबरप्लेट आढळून आली तर संबंधित वाहनचालकाला ताब्यात घेत संबंधित पोलीस ठाण्याला माहिती दिली जाते. असे आढळून आल्यास पोलिसांकडून त्याच्यावर कारवाई  केल्या जाते.राजेंद्र कडू, वाहतूक पोलीस निरीक्षक, वर्धा 

नंबरप्लेट बदलून करत होते शहरात लूटमार...शहरात काही दिवसांपूर्वी एकुर्ली येथील रहिवासी दोन चोरट्यांना रामनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले होते. ते चोरटे वयोवृद्ध पेंशनर्सला निर्जनस्थळी नेत त्यांच्याकडील पैसे हिसकावून नेत होते. पोलिसांनी तब्बल शंभरावर दुचाकींची तपासणी केली असता एका दुचाकीची नंबरप्लेट बोगस आढळून आल्याचे तपासात पुढे आले.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस