३६ वे एसपी म्हणून रुजू होणार निसार तांबोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 23:38 IST2018-07-28T23:37:50+5:302018-07-28T23:38:54+5:30
पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांची मुंबई येथे बदली करण्यात आल्याने वर्धेत ३६ वे पोलीस अधीक्षक म्हणून निसार तांबोळी हे रुजू होणार आहेत. हा बदली आदेश गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी निर्गमित केला आहे.

३६ वे एसपी म्हणून रुजू होणार निसार तांबोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांची मुंबई येथे बदली करण्यात आल्याने वर्धेत ३६ वे पोलीस अधीक्षक म्हणून निसार तांबोळी हे रुजू होणार आहेत. हा बदली आदेश गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी निर्गमित केला आहे.
पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांची मुंबई शहर पोलीस उप आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी वर्धेत मुंबई शहर पोलीस उप आयुक्त म्हणून कार्यरत असलेले निसार तांबोळी यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आली आहे. निसार तांबोळी हे पोलीस अधीक्षक म्हणून वर्धा जिल्ह्याची जबाबदारी सांभाळणारे ३६ वे अधिकारी राहणार आहेत. तांबोळी यांनी वर्धा जिल्ह्यात सन २००० ते २००५ या कालावधीत सेवा दिली आहे. त्यानी उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव तसेच पोलीस उपअधीक्षक (गृह) म्हणून वर्धा जिल्ह्यात यापूर्वी जबाबदारी सांभाळली असल्याचे सांगण्यात आले. तांबोळी यांचा इतर जिल्ह्यातील कामकाजाचा अनुभव वर्धेसाठी फायद्याचाच ठरणार असल्याचे बोलले जात आहे.