शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

निर्मल भारत अभियान शहरांपासून दूरच

By admin | Updated: September 7, 2014 00:05 IST

शासनाने गावे सुंदर व निर्मल करण्याकरिता निर्मलग्राम अभियान राबविले़ यास केंद्रस्तरावर निर्मल भारत अभियान नाव देण्यात आल्याने शहरांचाही त्यात समावेश होता; पण हे अभियान शहरात कधी

वर्धा : शासनाने गावे सुंदर व निर्मल करण्याकरिता निर्मलग्राम अभियान राबविले़ यास केंद्रस्तरावर निर्मल भारत अभियान नाव देण्यात आल्याने शहरांचाही त्यात समावेश होता; पण हे अभियान शहरात कधी आलेच नाही़ यामुळे जिल्ह्यातील सर्वच शहरे या अभियानापासून कोसोदूर आहे़ अनेक शहरांत उघड्यावरच शौचविधी उरकला जात असल्याने अभियानावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़वर्धा शहरातील आर्वी नाका परिसरातील दयालकृष्ण मार्केटच्या बाजूला लाडे यांच्या खाली जागेसमोर मुख्य रस्त्यावर दिवसरात्र हागणदारी सुरू असते. येथे कचऱ्याचा ढिगारा पडलेला असतो. या प्रकारामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ या ठिकाणी सतत वराहांचा सुळसुळाट असतो. परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे़ या भागातील नागरिक व व्यावसायिक घाण, दुर्गंधी व उघड्यावर उरकण्यात येणाऱ्या शौचविधीमुळे त्रस्त झाले आहेत़ पादचारी येथून नाक मुठीत धरून आवागमन करतात. या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक व व्यावसायिय यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डास व अन्य विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. कधीही साथीच्या आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ पालिका प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही होत आहे़वर्धा जिल्हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो. देश, विदेशातील पर्यटक या शहराला भेट देतात़ महात्मा गांधी व विनोबांच्या या पावन भूमीत अस्वच्छता, झोपडपट्टीतील नागरिक उघड्यावर शौचविधी उरकत असेल तर ती लांच्छणात्मक बाब म्हणावी लागेल़ हा प्रकार केवळ वर्धा शहरातच नव्हे तर पुलगाव, आर्वी, देवळी, सिंदी (रेल्वे) यासह अन्य शहरांतही दिसतो़ स्थानिक व जिल्हा प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा परिसर हागणदारीमुक्त करण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)