शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

नऊ महिन्यांत ६७ व्यक्तींची केली ४० लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर २३ मार्चपासून लॉकडाऊन घोषीत करण्यात आला. अनेकांच्या हाताची कामे गेली. त्यामुळे सर्व जण घरातच होते. त्यामुळे सायबर भामट्यांनी डोकेवर काढले. एटीएम फ्रॉड,  ईमेलवरुन फसवणूक आदी विविध प्रकारे भामट्यांनी  नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक केली.  त्यामुळे अनेकांनी फसवणूक होताच सायबर सेल गाठून तक्रार दाखल केली. माहिती तंत्रज्ञान कायद्यांअंतर्गत सोशल मीडिया व ई मेलवरुनही फसवणूक करण्यात आली.

ठळक मुद्देऑनलाईन फ्राॅड, सायबर सेलकडून १० गुन्ह्याची उकल I नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

चैतन्य जोशीलाेकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातून लाखो रुपये परस्पर काढून घेत आहेत. 'बँकेतून बोलतो, पेटीएमची केवायसी करुन देतो, एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे' आदी अनेक फंडे सायबर गुन्हेगार वापरुन नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढतात. महागडे स्मार्ट फोन वापरकर्त्यांना सायबर गुन्हेगार गंडवित आहेत. बतावणी करणाऱ्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस विभाग नेहमी करत असतानाही उच्चशिक्षीत महिला व पुरषांची ऑनलाईन फसवणूक होत आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत सायबर भामट्यांनी ६७ व्यक्तींची  तब्बल ४० लाख ९१ हजार ४६१ रुपयांनी ऑनलाईन फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. यापैकी १० गुन्ह्यांची उकल करुन ३ लाख ५० हजार रुपये परत आणण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक कर्यालयातील सायबर सेलला यश आले आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर २३ मार्चपासून लॉकडाऊन घोषीत करण्यात आला. अनेकांच्या हाताची कामे गेली. त्यामुळे सर्व जण घरातच होते. त्यामुळे सायबर भामट्यांनी डोकेवर काढले. एटीएम फ्रॉड,  ईमेलवरुन फसवणूक आदी विविध प्रकारे भामट्यांनी  नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक केली. त्यामुळे अनेकांनी फसवणूक होताच सायबर सेल गाठून तक्रार दाखल केली. माहिती तंत्रज्ञान कायद्यांअंतर्गत सोशल मीडिया व ई मेलवरुनही फसवणूक करण्यात आली. डेबीट, क्रेडीट कर्डाद्वारे देखीलही फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. तसेच इतर प्रकारे २६ व्यक्तींची    ऑनलाईनद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. आधीच लॉकडाऊनमुळे हाताचे काम गेलेल्या नागरिकांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांनी दरोडा टाकल्याने मोठे संकट कोसळले. मात्र, सायबर सेलचे दिनेश बोथकर, अक्षय राऊत, नीलेश कट्टोजवार, अनुप कावळे यांच्या अथक  प्रयत्नाने १० गुन्हे उघडीस आणण्यात यश आले असून पुढील गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.

एटीएम फ्रॉडचे १३ गुन्हे

एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. बदलावे लागेल, तुमचे कार्ड बदलिवण्यासाठी ओटीपी  क्रमांक सांगा, असा फेक कॉल भामट्याकडून येतो, काही शिक्षीत, उच्च शिक्षीत नागरिक विश्वास ठेवून ओटीपी देतात. आणि मग, लगेच बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेत फसवणूक केली जाते. असे तब्ब्ल १३ गुन्हे दाखल झाले आहे. 

सोशल मीडियावर २१ व्यक्तींची फसगत फेसबूक आणि व्हॉट्सअपवरुन मुलींचा छळ, तसेच फोटो व्हायरल करणे, फेसबूक हॅक करणे, बनावट अकाऊंट तयार करुन फसवणूक करण्याच्या २१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. 

टॅग्स :onlineऑनलाइनfraudधोकेबाजी