शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
8
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
9
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
10
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
11
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
12
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
13
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
14
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
15
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
16
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
17
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
18
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
19
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
20
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

निंबोली (शेंडे) पुनर्वसनचा तिढा सुटला

By admin | Updated: May 4, 2016 03:11 IST

निम्न वर्धा प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळत होता. यामुळे धरणात

१५ वर्षांच्या लढ्याला यश : २४.०३ हेक्टर जमिनीचा ताबा घेतला
आर्वी : निम्न वर्धा प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळत होता. यामुळे धरणात जमिनी गेलेल्या निंबोली (शेंडे) येथील गावकऱ्यांना हालअपेष्टा सहन करीत जीवन जगावे लागत होते. यावर तब्बल १५ वर्षांनी न्याय मिळाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या एका विशेष आदेशान्वये २४.०३ हेक्टर आर जमिनीचा ताबा मंगळवारी महसूल विभागाने पुनर्वसन विभागाला दिला. या जागेवर पुनर्वसितांची घरे उभारण्यात येणार आहेत.
जमिनीचा ताबा तहसीलदार, महसूल अधिकाऱ्यांकडून पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात घेतला. या जागेकरिता येथील १५ शेतकऱ्यांनी न्यायालयात विरोध याचिका दाखल केली होती. यात न्यायालयाने पुनर्वसनातील शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्याने जमिनीच्या हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. हस्तांतरणाची कारवाई मंगळवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत सुरू होती. अनुचित प्रकार टाळण्याकरिता पोलीस बंदोबस्त होता. यावेळी तहसीलदार बाळासाहेब मस्के, नायब तहसीलदार मिलिंद जोशी, मंडळ अधिकारी रणजित देशमुख, बी.एच. पांडे, तलाठी जुगनाके, पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता रब्बेवार, एन.बी. नेहारे, ठाणेदार शैलेश साळवी, संदीप हिवाळे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी उपस्थित होता.(तालुका प्रतिनिधी)

१५ शेतकऱ्यांनी केला होता जमीन देण्यास विरोध
४आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) या गावच्या नवीन गावठाण पुनर्वसनासाठी आर्वी देऊरवाडा मौजा दौलतपूर येथील १५ शेतकऱ्यांची ६० एकर म्हणजेच २४.०३ हेक्टर जमीन ताब्यात घेण्याचे प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात आले होते. परंतु या विरोधात १५ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते; परंतु यात न्यायालयाने नव्याने आदेश निर्गमित केले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या एका विशेष आदेशान्वये सदर भूखंडाची जमीन महसूल विभागाने पुनर्वसन विभागाला पंचसमक्ष हस्तांतरीत केली.

न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांनी मौजा दौलतपूर येथील २४.०३ हेक्टरचा ताबा घेण्याचे आदेश दिले होते. त्यावरून या जमिनीचा ताबा व हस्तांतरण संबंधीत पुनर्वसन विभागाला करण्यात आले.
- बाळासाहेब मस्के, तहसीलदार, आर्वी.