शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

थंडीची ‘नव्हाळी’, पारा नऊ अंशावर

By admin | Updated: December 26, 2015 02:11 IST

डिसेंबर महिन्याचा उत्तरार्धही संपत आला; पण थंडीचा जोर वाढत नव्हता. यामुळे यंदा गुलाबी थंडीपासून जिल्हावासी वंचितच राहतात की काय, असे वाटू लागले होते;

जिल्ह्यात शीतलहर : शेकोट्या पेटायला सुरुवात
वर्धा : डिसेंबर महिन्याचा उत्तरार्धही संपत आला; पण थंडीचा जोर वाढत नव्हता. यामुळे यंदा गुलाबी थंडीपासून जिल्हावासी वंचितच राहतात की काय, असे वाटू लागले होते; पण गत दोन दिवसांपासून जिल्हा गारठायला सुरूवात झाली आहे. सर्वत्र थंडीची लाट पसरून गुरूवारी रात्री पारा एकदम नऊ अंशांपर्यंत घसरल्याने सर्वांना कापरे भरले.
यंदा जिल्ह्यात विशेष पावसाची नोंद झाली नाही. डिसेंबर महिना संपत आला असतानाही विशेष असा गारठा जाणवत नव्हता. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण भारतातील चेन्नई परिसरात झालेल्या पावसामुळे सुरू झालेली थंडीची लाट पुन्हा ओसरली होती. यामुळे यंदा थंडी पडणार काय, असाच प्रश्न सर्वांना पडला होता; पण आठ ते दिवसांपासून दिल्ली, कोलकाता, गुजरात आदी राज्यांमध्ये तापमान घसरायला लागले आहे. काहीच दिवसांत महाराष्ट्रातही थंडीची लाट पसरणार, असे सांगितले जात होते. चार दिवसांपूर्वी असलेले ढगाळ वातावरण हटून बुधवारपासून जिल्ह्यात गारठा जाणवायला सुरुवात झाली. शुक्रवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात पारा ९ अंशांपर्यंत खाली उतरला. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असून आणखी काही दिवस गारठा कायम राहणार, असे सांगण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)

गरम कपड्यांच्या खरेदीची लगबग
उनी कपडे घेऊन दरवर्षी तिब्बती शरणार्थी जिल्ह्यात दाखल होतात. यंदा डिसेंबर महिना ओसरेपर्यंत विशेष गारठा न जाणवल्याने त्यांची दुकानेही आतापर्यंत ओस पडली होती. या चार ते पाच दिवसांपासून गारठ्यात वाढ झाल्याने आता-आता दुकाने सजू लागली आहेत. यावर्षी विशेष व्यवसाय होत नसल्याची भावना तिब्बती विक्रेते व्यक्त करीत आहेत.

उशिरा का होईना शेकोट्या पेटल्या
डिसेंबर महिना संपायला आला तरीही विशेष थंडी आतापर्यंत जाणवत नव्हती. यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या अद्याप पेटल्या नव्हत्या; पण आठवडाभरापासून तापमान कमी व्हायला लागल्याने शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.

पिकांच्या वाढीस मदत
गहू, चना आदी रबी हंगामातील प्रमुख पिकांसाठी थंड वातावरण आवश्यक असते. आतापर्यंत गारठा नसल्याने पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; पण थंडी वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.

स्वच्छ वातावरणामुळे वाढला गारठा
ढगाळ वातावरण असल्यास तापमानात घट होते. यामुळे मधले काही दिवस गारठ्यात घट झाली होती; पण आता हवेचा दाब वाढून वातावरण स्वच्छ झाल्याने गारठा वाढायला लागला आहे. शिवाय गार वारे वाहत असल्याने थंडीचा तडाखा अधिकच जाणवत आहे.