शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

बापूंपासून प्राकृतिक चिकित्सेचा वसा

By admin | Updated: May 24, 2014 00:04 IST

आधुनिक जीवनशैली आगामी पिढीकरिता एकप्रकारे शापच ठरत आहे़ स्पर्धा करताना आरोग्य आणि आहार याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते़ यातूनच नवनवीन व्याधी जन्माला येत असून

मुलाखत : मुलचंद बडजाते यांची माहिती

वर्धा : आधुनिक जीवनशैली आगामी पिढीकरिता एकप्रकारे शापच ठरत आहे़ स्पर्धा करताना आरोग्य आणि आहार याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते़ यातूनच नवनवीन व्याधी जन्माला येत असून आयुर्मर्यादा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येते़ संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या सुदृढ आरोग्याची पुंजी आहे़ हा मूलमंत्र महात्मा गांधी यांच्याकडून मिळाला. गांधीजींनी निसर्गाेपचारावर व्यापक काम केले आहे़ हाच वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न आहे़ बदलते जीवनमान आणि ऋतूमान पाहता प्राकृतिक चिकित्सा ही काळाची गरज ठरत आहे, विचार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मुलचंद बडजाते यांनी व्यक्त केले़ जिल्ह्यात बडजाते यांनी निसर्गोपचार क्षेत्रात केलेले कार्यच त्यांची ओळख बनले आहे़ वय वर्षे ८९ असताना त्यांची ठणठणीत असणार्‍या तब्बेतीचे गुढ याच आदर्श जीवनशैलीत आहे़ गांधी विचारांचे समर्थक असणारे मुलचंद बडजाते यांच्याशी केलेल्या संवादात त्यांनी स्वातंत्र समर काळातील घटनांपासून ते भूदान चळवळ, कृष्ठरूग्णांकरिता विनोबांचे कार्य, सेंद्रीय शेती, गोधन यासर्व घटनांच्या स्मृती जागृत केल्या. या संवादातून त्यांचा जीवनपटही उलगडत गेला़ महात्मा गांधी १९३३ ला वर्धेत आले़ त्यावेळी मुलचंदजींचे शालेय शिक्षण सुरू होते़ त्यांचे काका चिरंजीलाल बडजाते जमनालाल बजाज यांचे निकटवर्ती असल्याने त्यांचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग असत़ किशोरवयातच मुलचंदजींची महात्मा गांधींचे कार्य जवळून पाहिले़ हेच संस्कार त्यांच्यावर होवून राष्ट्रभक्तीचे बीज रूजले़ याविषयी सांगताना ते म्हणतात, गांधीजींसोबत जंगल सत्याग्रहात भाग घेतला़ यादरम्यान ‘आरोग्यकी पुंजी’(की टू हेल्थ) हे पुस्तक वाचण्यात आले़ यातूनच आदर्श जीवनमानाचा मार्ग सापडला़ पुस्तकात निसर्गोपचार पद्धती सांगितल्या आहे़ त्याचा संगम स्वत:च्या जीवनात केला आणि प्रचार व प्रसार केला़ सुदृढ आरोग्याचे तेच रहस्य आहे़ पिढीजात कापड व्यवसाय करताना आहार आणि व्यायामाकडे दुर्लक्ष केले नाही़ नियमित योग प्राणायाम केल्यास व्याधींमुक्त जीवन जगता येत असल्याचे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)