शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

'हिंदू दहशतवाद' शब्द काँग्रेसने आणला, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 14:00 IST

काँग्रेसने देशातील करोडो लोकांवर 'हिंदू दहशतवाद' म्हणून ठपका ठेवला.

वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानात पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातले भाजपा आणि मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

काँग्रेसने देशातील करोडो लोकांवर 'हिंदू दहशतवाद' म्हणून ठपका ठेवला. गेल्या हजारो वर्षांत हिंदूच्या दहशतवादीसंबंधी कोणती घटना घडली आहे का? इंग्रज इतिहासकारांनी सुद्धा असे केले नाही. आपल्या 5000 वर्षे जुन्या सभ्यतेला कलंक कोणी लावला? अशा काँग्रेसला आपण माफ करणार का? असे सवाल करत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच, काँग्रसचे नते सुशील कुमार शिंदे यांनी 'हिंदू दहशतवाद' शब्द आणला असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. काही दिवसांपूर्वीच कोर्टाचा निकाल आला आणि या निकालामुळे काँग्रेसच्या कटाचे सत्य देशासमोर आले. काँग्रेसकडून स्वच्छचा दूताचा अपमान करण्यात आला. काँग्रेसने दिलेली शिवी माझ्यासाठी दागिना आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

याचबरोबर, स्वामी असीमानंद यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावरून काँग्रेसचे षडयंत्र उघड झाले आहे. त्यामुळे देशातील जनतेने काँग्रेसला धडा शिकविण्याचा निर्णय घेतल्याचंही काँग्रेस जाणून आहे. म्हणूनच दोन्ही काँग्रेसचे नेते मैदान सोडून पळत आहेत. ज्यांनी हिंदू दहशतवादाचा प्रचार केलाय, ते लोक घाबरले आहेत. त्यामुळे याठिकाणी हिंदूंची लोकसंख्या कमी आहे, अशा मतदारसंघातून हे लोक निवडणूक लढवत आहेत, असा टोला नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला. 

याशिवाय, नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर निशाना साधत शरद पवार कुटुंबात अंतर्गत कलह असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'स्वतःच्या पुतण्याकडूनच शरद पवारांची दांडी गुल्ल झाली. शरद पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवत आहेत.'  तसेच, अजित पवारांच्या वादग्रस्त विधानाची आठवण नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले की, 'विसरु नका, जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी अजित पवार यांना धरणातील पाण्यासंदर्भात प्रश्न विचारायला गेले असता, त्यांना काय उत्तर दिले? त्यांना असे उत्तर दिले की, जे मी बोलूही शकत नाही.'

ज्यावेळी मावळचे शेतकरी आपल्या अधिकारांसाठी लढत होते, त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश देण्यात आला. शरद पवार स्वत: शेतकरी असूनही शेतकऱ्यांना विसरले, त्यांच्या कार्यकाळात कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण शरद पवार यांनी कोणचीच पर्वा केली नाही, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस