शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

नराधम बापास दहा वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:40 IST

अल्पयीन मुलीवर बलात्कार करण्याऱ्या नराधम बापास भादंविच्या कलम ३७६ (२) (एन.) (आय.) व कलम ५ (एन) तसेच पोस्कोच्या कलम ६ नुसार दहा वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याच्या साध्या कारावासारी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

ठळक मुद्देदंडही ठोठावला : विशेष सत्र न्यायाधीशांचा निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अल्पयीन मुलीवर बलात्कार करण्याऱ्या नराधम बापास भादंविच्या कलम ३७६ (२) (एन.) (आय.) व कलम ५ (एन) तसेच पोस्कोच्या कलम ६ नुसार दहा वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याच्या साध्या कारावासारी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल येथील विशेष सत्र न्यायाधीश मृद्रुला भाटिया यांनी दिला आहे. सदर शिक्षेस पात्र ठरलेला नराधम बाप देवळी तालुक्यातील आकोली परिसरातील रहिवासी आहे.सविस्तर वृत्त असे की, १२ वर्षीय पीडिता ही तिच्या आई आणि वडिलासोबत राहत होती. पीडितेची आई रोजमजुरीचे काम करून घरातील कर्त्याला हातभार लावत. तर वडिलाला दारूपिण्याचे व्यसन आहे. याच व्यसनाच्या आहारी गेलेला पीडितेचा वडिल कुठलाही कामधंदा करीत नाही. घटनेच्या दिवशी पीडिता ही तिच्या आईसोबत पलंगावर झोपलेली होती. त्यावेळी तिचे वडिल घरी नव्हते. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास पीडिता ओरडत असल्याचे आणि तिचा आवाज पीडितेच्या आईला आल्याने तिने ऊठून पाहिले असता आपल्या पोटचा गोळा असलेल्या अल्पवयीन मुलीवर बापच अतिप्रसंग करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने पीडितेच्या आईने पीडितेची नराधम बापापासून सुटका केली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने या घटनेची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकीच पीडिता आणि तिच्या आईला दिली. नराधम बापाने दुसºयाही दिवशी पीडितेच्या आईला धाक दाखवून पीडितेवर अतिप्रसंग केला. हा प्रकार घृणास्पद वाटल्याने पीडितेच्या आईसह पीडितेने पीडितेच्या आजीकडे जाण्याचे पसंत केले. तेथे त्यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पुलगाव पोलिसांनीही तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. शिपणे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. शासकीय बाजू जिल्हा शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. जी. व्ही. तकलावे यांनी न्यायालयात मांडली. त्यांनी आठ साक्षदार तपासत युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि पुरावे लक्षात घेऊन विशेष सत्र न्यायाधीश मृद्रुला भाटीया यांनी हा निर्णय दिला आहे.दोन्ही शिक्षा भोगणार एकत्रितनराधम बापास ३७६ (२), (एन) (आय) भा.द.वि व कलम ५ (एन) व शिक्षेचे कलम ६ बा.लै.अ.प्र.कायदा या दोन्ही कलमा नुसार १० वर्षे सश्रम कारावास व ५०० रूपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. दोन्ही शिक्षा शिक्षेस पात्र ठरणारा आरोपी एकात्रित भोगणार असल्याचे न्यायालयीन सूत्रांनी सांगितले. पैरवी अधिकारी म्हणून पोहवा रिंगणे यांनी काम पाहिले.