शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शहर सौंदर्यीकरणाच्या नावावर शेकडो हिरव्याकंच वृक्षांवर कुऱ्हाड

By admin | Updated: June 11, 2014 23:30 IST

मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे़ रस्त्याचे काम आणि शहराच्या कृत्रिम सौंदर्यीकरणासाठी हिरव्या वृक्षांची मात्र सर्रास कत्तल केली जात आहे़ समुद्रपूरला सुशोभित करण्यासाठी सुमारे दीडशे

प्रफुल्ल महंतारे - समुद्रपूरमुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे़ रस्त्याचे काम आणि शहराच्या कृत्रिम सौंदर्यीकरणासाठी हिरव्या वृक्षांची मात्र सर्रास कत्तल केली जात आहे़ समुद्रपूरला सुशोभित करण्यासाठी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी रस्त्याच्या दुतर्फा ही कडुनिंबाची झाडे लावण्यात आली होती़ ये-जा करणाऱ्यांना मायेची सावली देणारी ही अजस्त्र हिरवे सौंदर्य नष्ट केले जात आहे़ समुद्रपूर शहरातून जाणाऱ्या हिंगणघाट ते उमरेड मार्गावरील समुद्रपूरच्या विश्रामगृहापासून पोलीस ठाण्यापर्यंतच्या सुमारे दीड किमी रस्त्याच्या रूंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे़ या रस्त्यावर सुमारे दीडशे वर्षांपूर्वी लावण्यात आलेले शेकडो कडूनिंबाची झाडे आहेत़ रस्त्याच्या रूंदीकरणासाठी कडूनिंब व इतर प्रजातीच्या शेकडो वृक्षांची बेदरकारपणे कत्तल सुरू आहे़ पहिल्या टप्प्यामध्ये समुद्रपूर पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत रस्ता करण्यात येणार आहे़ या कामासाठी राज्य शासनाच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली़ असून यासाठी सुमारे एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत़ रस्त्याची रूंदी साडेबारा मिटर इतकी राहणार असून रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आणि दुतर्फा नाली बांधकामाची तरतूद करण्यात आली आहे़या रस्त्याच्या कामासाठी ज्या हिरव्या सौंदर्याचा बळी घेतला जात आहे, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लावण्याची व संगोपनाची जबाबदारी अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही़ या प्रकारामुळे संबंधित कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ वास्तविक निवीदा मंजूर करतेवेळीच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची बाब अंतर्भुत केली जाते़ रस्ता रूंदीकरणामुळे वाहतुकीची समस्या सुटून सौंदर्यात भर पडणार आहे़ यामुळे नागरिक या कामाचे स्वागत करीत असले तरी दीडशे वर्षांपासून छाया देणाऱ्या शेकडो वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जात असल्याने हळहळ व्यक्त होत आहे़