आजीसोबत वाद करून नग्नावस्थेतील मनोरुग्णाने केली दोघांची हत्या ! दंडुकाच्या वाराने झाले डोक्याचे दोन तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:12 IST2026-01-22T13:08:10+5:302026-01-22T13:12:00+5:30

Wardha : एका मानसिक रुग्णाने नग्नावस्थेत घराबाहेर येऊन एका वृद्धाच्या डोक्यात दंडुक्याने हल्ला केला. त्याने जवळपास दहा ते पंधरा वेळा प्रहार करत डोक्याचे दोन तुकडे केले. तो इथेच थांबला नाही, तर त्याने एका लहान मुलाला आणि दोन वृद्ध व्यक्तींनाही मारहाण केली.

Naked psychopath kills two after arguing with grandmother! His head was cut into two pieces with a baton blow | आजीसोबत वाद करून नग्नावस्थेतील मनोरुग्णाने केली दोघांची हत्या ! दंडुकाच्या वाराने झाले डोक्याचे दोन तुकडे

Naked psychopath kills two after arguing with grandmother! His head was cut into two pieces with a baton blow

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी (वर्धा) :
एका मानसिक रुग्णाने नग्नावस्थेत घराबाहेर येऊन एका वृद्धाच्या डोक्यात दंडुक्याने हल्ला केला. त्याने जवळपास दहा ते पंधरा वेळा प्रहार करत डोक्याचे दोन तुकडे केले. तो इथेच थांबला नाही, तर त्याने एका लहान मुलाला आणि दोन वृद्ध व्यक्तींनाही मारहाण केली. यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.२१) सकाळी १०:१५ वाजता आर्वीच्या भाजी मंडई परिसरात घडली. या घटनेने भीतीचे वातावरण पसरले. नागरिकांनी घाबरून घटनास्थळावरून पळ काढला.

रामकृष्ण वसंतराव राऊत (७५) आणि रामराव महादेवराव वांगे (४५, रा. मारुती वॉर्ड) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर शहजाद (ताज बेकरीवाला) आणि गुल्हाणे हे किरकोळ जखमी झाले आहेत. मथुरेश ऊर्फ मतेश गजानन लाडके (२२, रा. नेताजी वॉर्ड) हा मानसिक रुग्ण आहे. त्याने घरात आजीसोबत वाद करून तिला मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात नग्नावस्थेत बाहेर येऊन शहजादला उचलून जमिनीवर आपटले तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साधना आश्रम परिसरात रामकृष्ण राऊत यांच्या डोक्यावर दंडुक्याने प्रहार केला. यात राऊत यांच्या डोक्याचे दोन तुकडे झाले. जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता. माथेफिरू मथुरेशचा भयानक अवतार पाहून नागरिकांनी पळ काढला.

एसपींकडून पाहणी, नागरिकांशी चर्चा

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी घटनास्थळ गाठले. प्रत्यक्षदर्शी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तासभर थांबून वस्तुस्थिती आणि पार्श्वभूमी समजून घेतली. एसडीपीओ चंद्रशेखर ढोले, पोलिस कर्मचाऱ्यांना निर्देशित केले. सायंकाळी पावणेपाच वाजता अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

फॉरेन्सिक टीम दाखल

माहिती समजल्यानंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. तसेच जखमींना उपजिल्हा रुग्णालय आणि नंतर सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले. खास गोष्ट म्हणजे, घटनास्थळापासून शंभर फूट अंतरावरच उपविभागीय कार्यालय आहे. आवाज ऐकताच तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळ गाठले.

वाहतूक कर्मचाऱ्याचा हात मोडला

घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी खंडाळे व एकाने मनोविकृताला पकडण्यासाठी धाव घेतली. मात्र, त्याने हातातील झोडपा पोलिसांना मारला. खंडाळे यांनी तो अडविला तोच त्याने दुसरा दंडुका मारला त्यामुळे खंडाळे यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. दुसऱ्या कर्मचाऱ्याने सावधानता बाळगत मनोरुग्णावर मागून झोडपा मारला असता तो खाली पडला तेव्हा नागरिक मदतीला धावले व त्यांनी मनोरुग्णाला पकडून हातपाय बांधले.

माथेफिरूला हातपाय बांधून नेले ठाण्यात

माथेफिरू मथुरेशचा धोकादायक अवतार पाहून नागरिक घाबरले होते. नागरिकांनी एकत्र येऊन माथेफिरूने आणखी कोणालाही मारू नये, यासाठी लाठीकाठी आणि दोरीच्या साहाय्याने त्यास पकडून ठेवले. त्याचे हात आणि पाय बांधून पोलिस ठाण्यापर्यंत नेले. त्यानंतर त्यास ठाण्यात डांबण्यात आले. घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश डेहनकर यांनी सांगितले.

"मनोरुग्णाच्या हल्ल्यात एका वृद्धाचा जागीच मृत झाला, गंभीर जखमी तरुणाचाही उपचारादरम्यान सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, मनोरुग्णाला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यास तीन दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. डॉक्टरांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. त्याच्यावर दहा वर्षापासून अमरावतीच्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचार सुरू होते."
- चंद्रशेखर ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी

Web Title : बहस के बाद अर्वी में मानसिक रोगी ने दो की हत्या की।

Web Summary : अर्वी में एक मानसिक रोगी ने अपनी दादी से बहस के बाद नग्न होकर एक छड़ी से दो लोगों पर जानलेवा हमला किया, जिसमें एक बुजुर्ग व्यक्ति भी शामिल था। स्थानीय लोगों द्वारा काबू करने से पहले उसने दो अन्य को घायल कर दिया। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Mentally ill man kills two in Arvi after argument.

Web Summary : A mentally ill man in Arvi, naked after arguing with his grandmother, fatally attacked two people with a stick, including an elderly man. He injured two others before being subdued by locals. Police are investigating.