शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतने केली तहसीलची सफाई

By admin | Updated: September 3, 2015 01:52 IST

येथील ‘तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाची झोप उडाली.

आष्टीकर त्रस्त : तहसीलदाराच्या अजब कारभाराने नाराजीचा सूरआष्टी (शहीद) : येथील ‘तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाची झोप उडाली. बुधवारी चक्क नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून तहसील कार्यालयाची साफसफाई करुन घेतली. तहसीलदार सीमा गजभिये या नगर पंचायतच्या प्रशासक आहे. तहसील कार्यालयामध्ये धूम्रपान केला जातो. स्वच्छतागृहात दुर्गंधी पसरली होती. मात्र याकडे प्रशासकाचे दुर्लक्ष होत होते. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित करताच तहसील प्रशासन खळबडून जागे झाले. तहसीलदार गजभिये नगर पंचायतीच्या प्रशासकपदाच्या नावावर नगरपंचायतच्या दहा-बारा कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयात साफसफाईच्या कामाला लावले. आज सकाळी १० वाजता सफाई सुरू झाली. यावेळी सफाई कर्मचारी आपणावर अन्याय होत असल्याची कुजबुज करीत होते. तहसील कार्यालयाचे कामकाज स्वतंत्र आहे. याची यंत्रणा वेगळी आहे. त्यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप होत आहे. त्यांच्या बोलण्याची पध्दत धमकीवजा इशाऱ्याची असल्याने अवघ्या महिनाभरातच आष्टीवासीयांमध्ये नाराजीचा सूर आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. तहसील व नगरपंचायत या दोन्हीचा कारभार स्वतंत्र ठेवावा यासाठी समन्वय साधण्याची भूमिका आवश्यक आहे. नगर पंचायतचे प्रशासकपद असल्यामुळे येथील कर्मचारी तहसील कार्यालयात राबविल्याबाबत सवालही उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी)