शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोन्ही मृत्यूचे गूढ अद्याप कायमच

By admin | Updated: November 8, 2014 22:41 IST

गत एक आठवड्यात येथे पाच दिवसाच्या अंतरात दोन कथित आत्महत्या झाल्या. या दोन्ही आत्महत्या की हत्या याबाबत गुढ उकलण्यात पोलीस मात्र अद्याप अपयशी ठरले आहे.

हिंगणघाट : गत एक आठवड्यात येथे पाच दिवसाच्या अंतरात दोन कथित आत्महत्या झाल्या. या दोन्ही आत्महत्या की हत्या याबाबत गुढ उकलण्यात पोलीस मात्र अद्याप अपयशी ठरले आहे. या दोन्ही घटना पोलिसांकरिता आव्हान देणाऱ्या ठरत आहेत.येथील भारत दिनांत विद्यालयाच्या अनिल गुलाबराव भोस्कर (४५) यांनी शाळेत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना २८ आॅक्टोबर २०१४ ला सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात मृतकाच्या पत्नीने संस्था चालकावर आरोप लावून चौकशीची मागणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केली. त्याची शाई वाळण्यापूर्वीच भारत विद्यालयाची दहाव्या वर्गाची विद्यार्थिनी रेणुका आनंदा महतो ही बेपत्ता झाली. तिचा शोध लावण्यापूर्वीच ५ नोव्हेंबरला नांदगावच्या नदी घाटावरील पाण्यात तिचा मृतदेह आढळला. दोन्ही प्रकरणात प्रथमदर्शनी आत्महत्या दिसून येत असली तरी त्यांच्या मृत्यूचे गुढ मात्र अद्याप कायम आहे. मृतक अनिल भोस्कर यांनी घटनेच्या रात्री शाळेत चौकीदारी केली. सकाळी घरी पोहचून दिनचर्या आटोपून ९ वाजता सकाळचा न्याहारीही केली. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता. केवळ फोन आला म्हणून शाळेत जात असल्याचे घरी सांगत शाळा गाठली. आणि अर्ध्या तासातच त्यांचा मृतदेह फासावर लटकलेला आढळून आला. तर मृतक रेणुका महतो नेहमी प्रमाणे ती सकाळी ६ वाजता शिकवणीसाठी घरून निघाली; परंतु ती नित्याप्रमाणे घरी पोहचली नाही. काही तासातच तिची सायकल व दप्तर वणा नदीच्या पुलावर आढळले. ती मात्र बेपत्ता होती.या दोन्ही मृतकांची मृत्यूपूर्वीची वागणूक नित्याप्रमाणेच असल्याचे कुटुंंबीयांचे म्हणणे आहे. अवघ्या पाच दिवसातील दोन्ही मृत्यू संशयस्पद ठरत आहेत. याचे गुढ उकलण्यासाठी पोलिसांची विशेष प्रगती नाही. सदर प्रकरण आत्महत्या म्हणून बंद न करता त्यामागच्या कारणांचा शोध घेण्याची मागणी जनमाणसात जोर धरत आहे.(तालुका प्रतिनिधी)