शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शांती मोर्चातून नोंदविला मुस्लीम बांधवांनी निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

शांती मोर्चाची सुरूवात स्थानिक विश्रामगृह भागातील छोटी मशीद झाली. या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. सदर मोर्चाने उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : ‘त्या’ विधेयकावर पुनर्विचाराची मागणी

आर्वी : केंद्र सरकारने आणलेले नागरिकता संशोधन विधेयक धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करणारे ठरत असून या विधेयकावर सरकारने पुर्नविचार करावा, अशी मागणी मुस्लिम एकता मंचच्यावतीने काढण्यात आलेल्या शांती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. सदर आंदोलनादरम्यान उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.शांती मोर्चाची सुरूवात स्थानिक विश्रामगृह भागातील छोटी मशीद झाली. या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. सदर मोर्चाने उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. धर्माच्या आधारावर विभाजन करणारे हे विधेयक ठरत असल्याने त्यावर पुर्नविचार करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.मेहबूब कुरेशी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात मुन्ना बाबा कादरी, जावेद कादरी, मौलाना जावेद कादरी, अयुब खान, तब्बू हसन, मोहम्मद इरफान, कपूर बाबू, सज्जाद खान, प्यारेभाई कुरेशी, शब्बीर अहमद, अकील कुरेशी, अलीम पटेल, जाकीर हुसेन, अब्दूल तनवीर, अशरफ मोहम्मद, साबीर अली, हाजी वकील साहब, वयद खान, शेख मुकबल मंसुरी, शहजाद कुरेशी, मुंशी अहमद, सय्यद जुनेद, रहीमभाई कुरेशी, मोहम्मद जफर, युनुस अहमद शहा, शेख असलम खान आदी समाज बांधवांची उपस्थिती होती.

टॅग्स :Socialसामाजिक