शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

चोरीच्या संशयातून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 5:00 AM

आष्टी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादाराव ढोले यांची दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरी गेली होती. ती दुचाकी गजानन सलामे याने चोरल्याचा संशय होता. मृत गजानन सलामे हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. रविवारी तो गावात एका म्हशीवर अतिप्रसंग करताना दिसून आला होता.

ठळक मुद्देसुसुंद्रा येथील घटना : आरोपी पिता-पुत्रांना अटक, सहआरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दुचाकी चोरी केल्याच्या संशयातून युवकाच्या डोक्यावर उभारीने मारून हत्या करण्यात आली. कारांजा तालुक्यातील सुसुंद्रा येथे रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सोमवारी ही घटना उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली.गजानन सलामे (२३) रा. सुसुंद्रा असे मृताचे नाव आहे. दादाराव ढोले, वसंता दादाराव ढोले आणि गोपीचंद दादाराव ढोले अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.आष्टी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादाराव ढोले यांची दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरी गेली होती. ती दुचाकी गजानन सलामे याने चोरल्याचा संशय होता. मृत गजानन सलामे हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. रविवारी तो गावात एका म्हशीवर अतिप्रसंग करताना दिसून आला होता. आपली बदनामी होणार, या तीतीने रात्रीच्या सुमारास गजानन हा ढोले यांच्या घरावर चालून गेला आणि घरातील महिला तसेच मुलाबाळांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. गजाननने दिलेल्या धमकीने गावातील नागरिकांनी त्याला चोप दिला. रक्ताच्या थारोळ्यात गजानन पडून असल्याचे पाहून त्याची आजी आणि नातेवाईकांनी त्याला एका चादरीत बांधून घरी नेत खाटेवर टाकले. याच कारणातून दादाराव ढोले आणि त्यांच्या दोन मुलांनी गजानन सलामे याच्या डोक्यावर आणि हातावर उभारीने मारहाण करून त्याची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ही घटना सोमवारी उघडकीस येताच सुसुंद्रा गावात एकच खळबळ उडाली. आष्टीचे ठाणेदार जितेंद्र चांदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. तसेच वर्ध्यातून ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. कलावती सखाराम इरपाचे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.मृतदेह रात्रभर पडून होता रक्ताच्या थारोळ्यातसुसुंद्रा गावात गजानन सलामे याची हत्या करण्यात आली. रविवारी रात्री ही घटना घडली. मात्र, पोलिसांना या घटनेविषयी कुणीही दिली नाही. पोलीस पाटलाने याची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.मृतक गुन्हेगारी प्रवृत्तीचामृत गजानन सलामे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. घरफोडी, चोरी, दुचाकी जाळपोळ करणे आदी विविध गुन्हे त्याच्यावर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. गावातील नागरिकांना त्याचा त्रास होता, असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Murderखून