शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंवर अविश्वास आणण्यासाठी हालचाली

By admin | Updated: August 22, 2015 02:06 IST

एका सभापतीकडून सदस्यांना साकडे : जि.प. शिक्षण विभाग चांगलाच गोत्यात

राजेश भोजेकर वर्धासध्या गाजत असलेला कथित शिक्षक बदली घोटाळा आणि त्यातच विषयतज्ज्ञ भरती प्रक्रियेत गुणपत्रिका बदलविल्याप्रकरणी प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यासह एका गटशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ माजली आहे. सदर प्रकरण आपल्याही अंगलट येऊ शकते, या भीतीने एका सभापतीने सीईओंवर अविश्वास ठराव आणण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती असून याला काही सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोराही दिला आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर घेतलेल्या ठरावाच्या माध्यमातून गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देत तब्बल ३९ शिक्षकांच्या बदल्या करुन टाकल्या. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच एकच कल्लोळ उडाला. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांनी नियमावर बोट ठेवून एका गटशिक्षणाधिकाऱ्याला निलंबित केले. तसेच अन्य पाच गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले. यासोबतच शिक्षणाधिकारी(प्राथ.) यांच्यासह एका गटशिक्षणाधिकाऱ्याच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला. यामुळे शिक्षण विभाग गोत्यात आला आहे. हे प्रकरण गाजत असतानाच जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील आणखी एक गंभीर प्रकरण उजेडात आले. हा प्रकार पोलीस ठाण्यातही पोहोचला. यामुळे सर्वत्र विविध चर्चेला उधाण आले आहे. एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसारजि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली. यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीईओला येथेच रोखण्यासाठी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणावा लागेल. यासाठी आपण काही सदस्य एकत्र येऊ, असे ते सभापती म्हणाले. याबाबत काही अन्य सदस्यांशीही चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली, अशी माहिती सदर सदस्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. याबाबत त्या सदस्याने सदर सभापतीचे नाव छापू नका, असा आग्रहही धरला.