शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

खाणपट्टेधारकांना महिनाभराचा ‘अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील खाणपट्ट्यांची मुदत २०१७-१८ मध्येच संपली होती. त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून वारंवार नोटीस बजावून खाणपट्टे शासनजमा करण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्याला न जुमानता राजरोसपणे अवैध उत्खनन सुरूच ठेवले. काहींनी तर लाखो रुपये खर्चून नवीन मशिन लावत आपली मुजोरी कायम ठेवली.

ठळक मुद्देतहसीलदारांना बजावली नोटीस । क्रशर मशीन उचलण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुदत संपूनही दोन वर्षांपासून येळाकेळी येथे अवैधपणे उत्खनन सुरू होते. त्यामुळे महसूल विभागाने कारवाई करीत १३ खाणपट्टे ताब्यात घेत क्रशर मशीन व दोन हजार ब्रास गिट्टी जप्त करण्यात आली. आता खाणपट्टेधारकांना तहसीलदारांनी नोटीस बजावून महिनाभरात क्रशर मशीन हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे खाणपट्टेधारकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील खाणपट्ट्यांची मुदत २०१७-१८ मध्येच संपली होती. त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून वारंवार नोटीस बजावून खाणपट्टे शासनजमा करण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्याला न जुमानता राजरोसपणे अवैध उत्खनन सुरूच ठेवले. काहींनी तर लाखो रुपये खर्चून नवीन मशिन लावत आपली मुजोरी कायम ठेवली. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत येळोकेळी येथील तेरा खाणपट्टे शासनजमा केले आहेत. तेथे लावलेल्या १३ क्रशर मशीनलाही सिल ठोकले. सोबतच २ हजार ब्रास गिट्टी, चुरी व डस्टही जप्त करण्यात आली आहे.जप्त केलेल्या साहित्याच्या सभोवताल चुन्याने आखणी केली आहे. याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून पुढील कारवाईला गती देण्यात आली. आता तेराही खाणपट्टेधारकांना नोटीस बजावून त्यांच्या खाणपट्ट्यांवर लावलेल्या क्रशर मशीन महिनाभरात तेथून हटवून खाणपट्टा खाली करावा, अन्यथा शासन जमा करण्यात येईल, अशा सूचनाही महसूल प्रशासनाच्या देण्यात आल्या आहेत.त्यामुळे आता खाणपट्टेमालकांना आपला गाशा गुंडाळण्याशिवाय पर्याय राहिला नाही. प्रशासनही खाणपट्टे खाली करून नव्याने लिलाव करण्याच्या कामाला लागले आहे.बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे) येथे होणार कारवाईयेळाकेळी येथील कारवाईनंतर सर्व खाणपट्टेधारकांचे धाबे दणाणले आहे. सर्व खाणपट्टे शासनजमा करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून कारवाईला गती दिली आहे. वर्ध्याच्या तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी शनिवारी बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे) व डोरली येथील सहा खाणपट्ट्यांची तपासणी केली आहे. त्यामध्ये सावंगी (मेघे) येथील चोथमल लालवाणी, भीमसेन लालवाणी, सतीश जेठवा, चंद्रकांत दौड तर बोरगाव (मेघे) येथील मनोज कावरे व डोरली येथील शेख नझीम शेख रज्जाक यांच्या खाणपट्ट्यांचा समावेश आहे. आता यांच्या खाणपट्ट्यांची सखोल माहिती घेऊन अनधिकृत असल्यास त्यांनाही नोटीस बजावून कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी सांगितले.येळाकेळी येथील तेरा खाणपट्ट्यंवर कारवाई केल्यानंतर इतरही खाणपट्टे शासनजमा करण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत. आता येळाकेळी येथील जप्त केलेल्या मालाचा खुलासा करण्यासंदर्भात तहसीलदारांनी खाणपट्टेधारकांना नोटीस बजावली आहे. तसेच यंत्रसामग्रीही उचलून खाणपट्टा खाली करण्याकरिता महिनाभराचा कालावधी दिला आहे. या महिनाभरात सर्व खाणपट्टे शासनाच्या ताब्यात येऊन पुढील कारवाई केली जाईल.डॉ. इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा

टॅग्स :Socialसामाजिक