शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
4
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
5
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
6
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
7
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
8
नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
9
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
10
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
11
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
12
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
13
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
14
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
15
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
16
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
17
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
18
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
19
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
20
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लॅाकडाऊन काळातील वाढीव विद्यूत देयकाविरुद्ध ‘मनसे’ चा जनआक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 05:00 IST

१ एप्रिलपासून वीज दरवाढीचा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना चांगलाच शॉक दिला. लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी वाढल्याने जनता होरपळून निघाली. सामान्यांच्या हाताला काम नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. अशातच भरमसाठ देयक दिल्याने कुटुंबाला जगवावं की वीज देयक भरावं, असा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. आधी शंभर युनिटपर्यंत वीज देयकामध्ये सवलत देण्याचे आश्वासन देणाऱ्या  ऊर्जा मंत्र्यांनी आता घुमजाव करुन वीज देयक भरलेच पाहीजे, अशी भाषा केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

    लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मार्च महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेल्याने आर्थिक कोंडी झाली. अशातच मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत घरगुती वापराच्या विजेचे दुप्पट-तिप्पट देयक आकारण्यात आले. हे वीज देयक माफ करण्याच्या मागणीकरिता अनेकदा निवेदन दिले पण, काहीही फरक पडला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात मनसेने जनआक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.१ एप्रिलपासून वीज दरवाढीचा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना चांगलाच शॉक दिला. लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी वाढल्याने जनता होरपळून निघाली. सामान्यांच्या हाताला काम नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. अशातच भरमसाठ देयक दिल्याने कुटुंबाला जगवावं की वीज देयक भरावं, असा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. आधी शंभर युनिटपर्यंत वीज देयकामध्ये सवलत देण्याचे आश्वासन देणाऱ्या  ऊर्जा मंत्र्यांनी आता घुमजाव करुन वीज देयक भरलेच पाहीजे, अशी भाषा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची झालेली ही अडचण सोडविण्याकरिता तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात मुख्यमंत्री, ऊजामंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अभियंता यांना बरेचदा निवेदन दिले. आंदोलने केली तसेच काळे कपडे परिधान करून निषेध केला तरीही जाग आली नाही. त्यामुळे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता हे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले आहे. आता जोपर्यंत लॉकडाऊन काळातील वाढीव वीज देयक सरसकट माफ करणार नाही तो पर्यंत वीज जोडणी कापू देणार नाही. महाविरतणच्या कर्मचाऱ्यांकडून विद्युत जोडणी कापण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताकतीने उभी राहून कायदा हातात घेणार, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. शहरातील पोस्ट ऑफीस चैाकातून निघालेला हा मोर्चा डॅा. बाबासाहेब आंबेडकर चैाकात थाबविण्यात आला. येथून शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले. या मोर्चात नितीन अमृतकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, विजू वाघमारे, सुभाष चौधरी, शंकर पोटफोडे, राहुल वाढोणकर, जिल्हासचिव सुनील भुते, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष रमेश घंगारे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर, राहुल सोरटे, मारोती महाकाळकर, उमेश नेवारे, शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष मनोज गिरडे, सुधाकर वाढई, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजु मुडे, तालुकाध्यक्ष निलेश खाटीक, जयंता कातरकर, वासुदेव वैरागडे, अमोल मेंढुले, मोरेश्वर येडें, राजु भोंमले, किशोर हुलके, धनंजय भोंभे यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसेelectricityवीज