शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रेत्या कुटुंबाचा महिला पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला

By admin | Updated: May 17, 2017 00:31 IST

दारू पकडण्यास गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर दारूविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाने हल्ला केला.

इतवारा भागातील घटना : महिला, मुलगा ताब्यात, पती फरार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : दारू पकडण्यास गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर दारूविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाने हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री इतवारा परिसरात घडली. दारूविक्रेत्या कुटुंबातील सदस्यांनी सदर महिला पोलीस अधिकाऱ्याला शिविगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. गावठी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. यावरून शहर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके यांनी पथकासह इतवारा परिसर गाठला. त्यांनी चेतना पाला हिच्या घराची झडती घेतली असता गावठी दारूने भरलेली कॅन व ग्लास दिसून आला. यावेळी दारूविक्रेत्या चेतना पाला, तिचा पती संजय तसेच मुलगा व मुलीने कारवाई करण्यास आलेल्या पोलिसांशी वाद घालत पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके यांच्यावर हल्ला चढवित मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या. आरोपींनी त्यांचे कपडे फाडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी रामटेके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चेतना पाला, तिच्या पतीसह मुलगा व मुलीवर भादंविच्या कलम ३९४, ३५३, ३३२, ३४, ६५ (ई.) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. पाला दाम्पत्यावर चंद्रपुरातही गुन्हे इतवारा भागातील चेतना पाला व तिचे कुटुंबिय दारूविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याविरूद्ध दारूविक्रीबाबत वर्धेसह चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे ४० गुन्हे दाखल आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर पाला कुटुंबाने गावठी दारू विक्रीचा ठोक व्यवसाय सुरू केला. पोलिसांवरच हल्ले होत असल्याने वचक नसल्याची शहरात चर्चा आहे.