शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ शहरात मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीसह शहरातील हिंदुत्ववादी व विविध संघाटनांच्यावतीने शहरातून मार्च काढण्यात आला. ‘वंदे मातरम् आणि भारत माता की जय’ च्या घोषणा देत निघालेल्या या मार्चने शहरातून मार्गक्रमण केले. स्थानिक केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावरुन दुपारी या मार्चची सुरुवात करण्यात आली. तेथून निघालेला हा मार्च शिवाजी चौकातून पावडे चौक, वंजारी चौक, सोशालिस्ट चौकातून मुख्यमार्गाने जात केसरीमल शाळेच्या मैदानातच या मार्चचा समारोप करण्यात आला.

ठळक मुद्देभारत माता की जय’ च्या घोषणा : विविध संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीसह शहरातील हिंदुत्ववादी व विविध संघाटनांच्यावतीने शहरातून मार्च काढण्यात आला. ‘वंदे मातरम् आणि भारत माता की जय’ च्या घोषणा देत निघालेल्या या मार्चने शहरातून मार्गक्रमण केले.स्थानिक केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावरुन दुपारी या मार्चची सुरुवात करण्यात आली. तेथून निघालेला हा मार्च शिवाजी चौकातून पावडे चौक, वंजारी चौक, सोशालिस्ट चौकातून मुख्यमार्गाने जात केसरीमल शाळेच्या मैदानातच या मार्चचा समारोप करण्यात आला. या मार्चमध्ये भारतीय जनता पार्टी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यासह विविध हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकही सहभागी झाले होते. या मार्चमध्ये शंभर मीटर लांबीचा तिरंगा घेऊन देशातील अखंडतेचे दर्शन घडविले.यात खासदार रामदास तडस, माजी खासदार विजय मुडे, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा अर्चना मुडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, नगरसेवक वरुण पाठक, नगरसेवक निलेश किटे, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, गुंडू कावळे, श्रीधर देशमुख, नगरसेविका श्रेया देशमुख, गटनेता प्रदीप ठाकरे, माजी नगरसेविका माया उमाटे, हर्ष तिवारी, सचिन अग्निहोत्री, अमीत ठाकूर, अनुप जयस्वाल, राजेश बकाने, आशीष कुचेवार यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महिलांची उपस्थितीशहरातून निघालेल्या या मार्चमध्ये महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यांनीही हाती भगवे झेंडे घेऊन घोषणा देत नागरिकत्व विधेयकाचे समर्थन केले.

टॅग्स :Socialसामाजिक