शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Maharashtra Election 2019 ; मतविभाजनावर देवळीचा निकाल अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 6:00 AM

गेल्या चाळीस वर्षांपासून मावशी व भाचा या दोघांचे वर्चस्व असलेल्या सुरुवातीच्या पुलगाव व नंतरच्या देवळी मतदारसंघात यावेळीही जोरदार लढाई ...

ठळक मुद्देरणजित कांबळेंप्रती नाराजी । बसप, वंचित व अपक्ष किती घेणार मते?

गेल्या चाळीस वर्षांपासून मावशी व भाचा या दोघांचे वर्चस्व असलेल्या सुरुवातीच्या पुलगाव व नंतरच्या देवळी मतदारसंघात यावेळीही जोरदार लढाई होत आहे. गेल्या वीस वर्षांपासून आमदार असणाऱ्या रणजित कांबळे यांची या निवडणुकीत सत्त्वपरीक्षा आहे. निवडून गेल्यानंतर साडेचार वर्षांनंतरच दर्शन देणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची या मतदारसंघात ओळख आहे. यावेळी जातीय समीकरणात शिवसेनेचा उमेदवार निवडणुकीच्या प्रचारात जोरदार मुसंडी मारून आहे. शिवसेनेने समीर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. ते नवा चेहरा असल्याने भाजपचे बहुतांशी नेते त्यांच्यासोबत प्रचारात असल्याचे दिसून येत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच या मतदारसंघात रणजित कांबळेंची साथ सोडून दिली आहे.लोकसभा निवडणुकीत रणजित कांबळे यांच्यामुळे चारूलता टोकस यांना या मतदारसंघात जोरदार फटका बसला. त्यामुळे त्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघापासून कोसोदूर आहेत. प्रभाताई राव यांना मानणारा मतदारांचा मोठा वर्ग रणजित कांबळेंच्या कामगिरीवर नाराज आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, अपक्ष राजेश बकाणे, दिलीप अग्रवाल, उमेश म्हैसकर हे प्रमुख उमेदवार किती मतांचे विभाजन घडवून आणतात, यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत होईल, याशिवाय दलित व मुस्लिम व मतांमध्येही विभागणी होण्याची शक्यता आहे.बंडखोराची चर्चा जोरातहा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले राजेश बकाणे यांनी येथे बंडखोरी केली आहे. त्यांच्या बंडखोरीची मोठी चर्चा या मतदारसंघात आहे. तर काँग्रेसमध्ये असताना मेघे समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिलीप अग्रवाल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.भाजपचा मोठा फौजफाटा बकाणेंच्या प्रचारात दिसत असला तरी शिवसेना व खासदार रामदास तडस यांच्यासह भाजपचे सर्व मातब्बर युतीचे उमेदवार समीर देशमुख यांच्यासोबतच आहेत. त्यामुळे शिवसेना येथे निकरीची झुंज देत आहे.या मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात आहेत. देवळी व पुलगाव या नगर पालिका भाजपच्या हातात आहेत. खासदार रामदास तडस यांची भूमिका या मतदारसंघात अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजपला येथे निसटता पराभव पाहावा लागला. यावेळी शिवसेना हा गड सर करेल काय? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.देवळी मतदारसंघात शिवसेना उमेदवार समीर देशमुख यांना सहकार गटासह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, सेना यांच्या कार्यकर्त्यांची समर्थपणे साथ मिळाली आहे. बापूरावजी देशमुख यांच्या काळातील सहकार गटाचे अनेक जुने पदाधिकारी समीर देशमुख यांच्या प्रचारासाठी या मतदारसंघात फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा