शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रेती घाटावरील कारवायांनी माफियांचे धाबे दणाणले

By admin | Updated: December 18, 2014 02:05 IST

तालुक्यातील १० रेतीघाटांमधून गेल्या दीड महिन्यांपासून रेतीचा अवैध उपसा सुरू होता. चोरट्यांनी रात्रीला रेतीची वाहतूक करण्याचा सपाटा लावल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता.

आष्टी (श): तालुक्यातील १० रेतीघाटांमधून गेल्या दीड महिन्यांपासून रेतीचा अवैध उपसा सुरू होता. चोरट्यांनी रात्रीला रेतीची वाहतूक करण्याचा सपाटा लावल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. याप्रकरणी ‘लोकमत’ने अवैध रेतीच्या उपशावर वृत्त प्रकाशित करताच तहसीलदारांनी धडक कारवाईची मोहीम सुरू केली. रेती चोरी पकडण्यासाठी तहसीलदार एस. एस. पाटील, अतिरिक्त तहसीलदार आर. एस. हिरणवार यांनी तीन भरारी पथक तयार केले. यामध्ये नायब तहसीलदार मृदुलता मोरे, व्ही. पी. हूड, राजेंद्र देशमुख यांच्या अधिनस्थ असलेले मंडळ अधिकारी, तलाठी रेती घाटावर जाऊन ट्रक, ट्रॅक्टर पकडून बाजारभावाच्या तिप्पट रकमेचा दंड देऊन चालानद्वारे शासनाला भरण्यास भाग पाडत आहे. खंबित, अंतोरा, भारसवाडा, टेकोडा, गोदावरी या पाच घाटांमधून आतापर्यंत ३२ ट्रॅक्टर, १४ ट्रक पकडण्यात आले. त्यांच्याकडून आतापर्यंत अडीच लाख रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले. ३० सप्टेंबर रोजी रेतीघाटाची मुदत संपली होती. १ आॅक्टोबरपासून रेतीच्या चोरीसाठी चोरट्यांनी विविध मार्गांचा अवलंब केला. यामध्ये चोरीची रेती जमा करून ठेवायची आणि लिलावद्वारे रॉयल्टी घेऊन विकायची, या मिळालेल्या रॉयल्टीवर रेतीघाटावरून आणखी रेती चोरून परत ठिय्यावर गोळा करायची असा गोरखधंदा चोरट्यांनी अवलंबिला होता. मात्र भरारी पथकाच्या धास्तीमुले चोरट्यांचे मनसुबे पूर्णत्वास गेले नाही.सद्यस्थितीमध्ये तालुक्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. तरीसुद्धा बांधकामावर रेतीचे ठिय्ये ठिकठिकाणी दिसत आहे. या ठिय्याला पकडण्याचे आव्हान महसूल यंत्रणेसमोर आहे. रेतीचोरी हा दंडात्मक कारवाईचा मार्ग असला तरी फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र प्रशासन कायद्याच्या पळवाटा शोधून रेतीचोरट्यांना एकप्रकार अभयच देत असल्याचा आरोप रेतीघाटामुळे त्रस्त असलेल्या गावातील नागरिकांनी केला आहे. तहसीलदार एस. एस. पाटील यांनी चोरीची रेती दिसल्यास तात्काळ भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे. तालुक्यात एका अधिकाऱ्याने रेतीचोरांना अभय दिल्याचा आरोप होत आहे. सदर अधिकारी सुटीच्या दिवशी चोरट्यांशी अर्थपूर्ण व्यवहार साधण्यासाठी गुप्त बैठक घेतात. याप्रकरणी तहसीलदारांना माहिती देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)