शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

मदन उन्नईचे विश्रामगृह रखडले

By admin | Updated: May 18, 2016 02:17 IST

पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे मदन उन्नई धरणावर प्रस्तावित विभामगृहाचे बांधकाम अद्यापही रखडले आहे.

अधिकारी अनभिज्ञ : अनाठायी खर्च करून सोडले कंत्राटदाराने कामआकोली : पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे मदन उन्नई धरणावर प्रस्तावित विभामगृहाचे बांधकाम अद्यापही रखडले आहे. अधिकारीच नसल्याने सात-आठ वर्षांपासून बांधकामाचा तिढा सुटलेला नाही. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. मदन उन्नई प्रकल्पाला भेट देणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासाठी येथे थांबण्याची सोय नव्हती. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांच्या संकल्पनेतून विश्रामगृहाच्या निर्मितीला मूर्त स्वरूप आले. बांधकामाकरिता निधीही मंजूर करण्यात आला. नियोजित जागेचे मोठा गाजावाजा करून भूमिपूजन करण्यात आले. बांधकामालाही सुरूवात झाली होती; पण बांधकामाचे फाऊंडेशन (जोता) पूर्ण झाल्यानंतर काम पुढे सरकलेच नाही. बांधकामासाठी पाणी गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन विहिरीचे खोदकाम व बांधकाम नियोजित विश्रामगृहाच्या बाजूला करण्यात आले. या माध्यमातून सदर कामासाठी लाखो रुपयांचा आगाऊ खर्च करण्यात आला. असे असले तरी अद्यापही बांधकामाने गति घेतली नाही. संबंधित कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून दिल्यानंतर दुसऱ्या कंत्राटदाराला काम देणे क्रमप्राप्त होते; पण याबाबत अधिकाऱ्यांनी रूची दाखवली नाही. यामुळे आठ वर्षांपासून बांधकाम जैसे थे आहे. खोदकाम व बांधकाम यात आलेला खर्च तसेच विश्रामगृहाच्या बांधकामावर आतापर्यंत झालेला खर्च अनाठायी झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून झालेल्या खर्चाची वसुली होणार काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.(वार्ताहर)धरण होणार प्रकाशमानमदन उन्नई धरण परिसरात होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत ‘लोकमत’ ने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. धरण परिसरात फेरफटका मारला असता धरणाच्या भिंतीवर साडे तीन फूट खोल व दोन ते अडीच फुट रुंद लांबच-लांब चर खोदल्याचे आढळून आले. याबाबत अधिक माहिती घेतली असता पर्यटकांच्या दृष्टीने तसेच अवैध प्रकार टाळता यावे म्हणून पथदिवे बसविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. धरण परिसरात अवैध उत्खनन करून मुरूम चोरी होत होती. यासाठीच तर चर खोदण्यात आली नाही ना, अशी शंका उपस्थित होत होती; पण पथदिवे लागणार असल्याने परिसरात चालणाऱ्या अवैध प्रकारांवर चाप बसणार असून ग्रामस्थांना दिलासा मिळाला.