शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची लूट

By admin | Updated: July 20, 2015 02:11 IST

सध्या विद्यार्थी व शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांची गरज पडत आहे. यात कागदपत्रे व अन्य कामांत मोठी लूट केली जात आहे. प्

प्रशासनाचे दुर्लक्ष : लाभासाठी वृद्धांनाही माराव्या लागतात चकरातळेगाव (श्या.पं.) : सध्या विद्यार्थी व शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांची गरज पडत आहे. यात कागदपत्रे व अन्य कामांत मोठी लूट केली जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. उत्पन्न, नॉन क्रिमीलेअर, जात, रहिवासी तसेच गॅप सर्टीफीकेट आदी प्रमाणपत्रांकरिता वेगवेगळी प्रकरणे तयार करावी लागतात. यासाठी प्रत्येक वेळी पोलीस पाटील, सरपंच, तलाठी यांच्याकडून जात तसेच रहिवासी दाखले घ्यावे लागतात. प्रत्येक दाखल्याच्या वेळी आर्थिक व्यवहार करावा लागत असून वेळही वाया जातो. यात होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पोलीस पाटील, सरपंच, तलाठी यांचे दाखले प्रत्येक प्रमाणपत्रासाठी आवश्यक असतात. तलाठी कार्यालयात पालक, पाल्यांची अधिक गर्दी दिसून येते. या ठिकाणीही दाखल्याचे ३० ते ४० रुपये घेतले जात असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. वास्तविक, हे दाखले नि:शुल्क देणे तलाठ्याचे काम आहे. हे सर्व दाखले घेऊन तहसील कार्यालयात अ‍ॅफेडेव्हीट करताना अर्जनवीस ९० ते १०० रुपये घेतो. सोबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचे ११० रुपये द्यावे लागतात. यानंतर सेतू केंद्रामध्ये प्रत्येक प्रकरणाचे ३० ते ४० रुपये लागतात. एका प्रमाणपत्राला पालकांना ३०० ते ४०० रुपये खर्च येतो. शिवाय तहसील कार्यालयात ये-जा करण्यासाठी लागणारा खर्च वेगळाच! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, राजीव गांधी आदी योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक कामासाठी तलाठी व तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात. पैशाशिवाय कोणतेही काम होत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)