शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादकांची लूट

By admin | Updated: January 24, 2015 22:58 IST

जिल्ह्यात सीसीआयचे कापूस संकलन केंद्र बंद झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच फरफट होत आहे. शासकीय खरेदी बंद झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकरी व्यापाऱ्यांना

३,४०० ते ३,८०० रुपये क्विंटलने खरेदी वर्धा : जिल्ह्यात सीसीआयचे कापूस संकलन केंद्र बंद झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच फरफट होत आहे. शासकीय खरेदी बंद झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकरी व्यापाऱ्यांना नाईलाजास्तव अत्यल्प दरात कापूस विक्री करीत आहेत. जिल्ह्यातील काही बाजार समितीत शुक्रवारी ३ हजार ३०० तर ३ हजार ४०० रुपये क्विंटलच्या दरात कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला. यामुळे कापूस उत्पाकांना मोठा आर्थिक फटका असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सीसीआयची कापूस खरेदी बंद होताच बाजारात व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दरात कापूस खरेदी सुरू झाल्याने सीसीआय व कापूस व्यापारी यांच्यात मिलिभगत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. यंदाच्या हंगामात सीसीआय व पणन महासंघ यांच्यात सख्य झाले. दोन्ही एजन्सी शासनाच्या असताना पणन महासंघाला सीसीआचा सबएजन्ट म्हणून काम करावे लागले. ज्या ठिकाणी सीसीआयचे केंद्र नव्हते अशाच ठिकाणी पणन महासंघाचे केंद्र सुरू झाले. या केंद्रावर कापूस उत्पादक फिरकलेही नाही; मात्र सीसीआयच्या केंद्रावर मिळत असलेल्य हमीभावामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस या केंद्रावर नेला. अशात गत तीन चार दिवसांपासून जागेचे कारण काढत सीसीआयने कापूस खरेदी बंद केली. यामुळे व्यापाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. बाजारात आलेला शेतकरी सीसीआयची खरेदी बंद असल्याने आल्या पावली परत जावे लागत आहे. यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून भाव कमी करीत कापूस खरेदी करीत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शिवाय रोख रकमेचे कारण काढत व्यापारी आणखी दर पडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यामुळे सीसीआयची खरेदी सुरू करण्याची मागणी आहे.(प्रतिनिधी)७शेतकऱ्यांवर आल्या पावली परत जाण्याची वेळ शेतकरी त्यांच्या परिसरात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती वा इतर ठिकाणी असलेल्या सीसीआयच्या केंद्रावर कापूस घेवून गेल्यावर सीसीआयची खरेदी बंद करण्यात आल्याची माहिती दिली जाते. आधीच अडचणीत असलेला शेतकरी त्याचा असलेला कापूस घवून घरी परत आणण्यापेक्षा मिळेत त्या दरात तो विकण्याचा निर्णय घेत आहे. याचा लाभ व्यापाऱ्यांना होत असल्याचे चित्र आहे. सीसीआयला हवा नवा कापूस शेतकऱ्यांकडे असलेला कापूस हा दुसऱ्या वेचणीचा आहे. पहिल्या वेचणीचा कापूस शेतकऱ्यांकडून केव्हाच विकल्या गेला आहे. यामुळे बाजारात येत असलेला कापूस खरेदी करण्यास सीसीआय नकार देत आहे. सीसीआयचा हा नकार व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. यामुळे सीसीआय व व्यापारी यांच्यात साटेलोटे असल्याचा प्रत्यय येत आहे.