कर्जाचे हप्ते कंपनीत न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले; फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 20:09 IST2026-01-03T20:08:24+5:302026-01-03T20:09:46+5:30
Wardha : तक्रारकर्ता हे ९ सप्टेंबर २०२३ पासून १३ एप्रिल २०२५ पर्यंत आर्वी येथील शाखेत ब्रँच मॅनेजर पदावर कार्यरत होते. याच कार्यकाळात आरोपी हे कंपनीमध्ये संघम मॅनेजर म्हणून काम करीत होते.

Loan installments were used for personal gain instead of paying them to the company; Finance company employees cheated them of lakhs
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारत फायनाशिअल इंक्लूजन लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी १४५ सदस्यांकडून वसूल केलेले कर्जाचे हप्ते कंपनीत न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरत कंपनीची २० लाख ७६ हजार ८०१ रुपयांची फसवणूक केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली.
याप्रकरणी बीएफआयएल बॅच मॅनेजर इरफान खान बशीर खान (३५, रा. पिपळखुटा, ता. मोर्शी, जि. अमरावती. ह.मु रामनगर चांदूर रेल्वे) यांनी आर्वी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सागर अशोकराव देशमुख (२९, रा. शिररखेड ता. मोर्शी, जि. अमरावती), दर्शना रामदास खाजोने (२१, रा. आष्टी, जि. वर्धा), मनोज बंडूजी निंबुळकर (२९, रा. मोहदी, धोत्रा, जि. नागपूर), अजय सुखदेव उईके (रा. दळवी मोहदी, जि. नागपूर) व अमीर खान हमीद खान (२४, रा. शेंदुरजनाघाट, जि. अमरावती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारकर्ता हे ९ सप्टेंबर २०२३ पासून १३ एप्रिल २०२५ पर्यंत आर्वी येथील शाखेत ब्रँच मॅनेजर पदावर कार्यरत होते. याच कार्यकाळात आरोपी हे कंपनीमध्ये संघम मॅनेजर म्हणून काम करीत होते. यामधील आरोपी सागर देशमुख यांनी साधारणतः ८ जुलै ते ८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १२ सदस्यांकडून लोन प्रीक्लोज रक्कम १ लाख ५६ हजार ४०५ रुपये घेतले व आर्वी येथील ऑफिसमध्ये भरले नाही. तसेच दर्शना खाजोने याने साधारणतः ५ जुलै ते १२ जुलै २०२४ पर्यंत एकूण १६ सदस्यांकडून १ लाख १३ हजार ३९०, मनोज निंबुलकर यांनी ७ मे ते १९ जुलै २०२४ या कालवधीमध्ये ५२ सदस्यांकडून १० लाख ८५ हजार ९२९ रुपये, तर अजय उईके यांनी २१ जून ते २७ जून २०२४ एकूण ४६ सदस्यांची ६ लाख ५६ हजार ८९७ रुपये तर अमीर खान हमीद खान याने २५ ऑक्टोबर २०२४ ते १४ जानेवारी २०२५ पर्यंत १९ सदस्यांकडून लोनचे प्रीक्लोजचे ६४ हजार १८० रुपये या सर्व आरोपीने एकूण १४५ सदस्यांकडून २० लाख ७६ हजार ८०१ रुपये वसूल केले मात्र, ते कंपनीमध्ये जमा केलेच नाही.