शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेतल्या कलाकारांसोबत सखींची थेट भेट

By admin | Published: June 20, 2016 2:00 AM

लोकमत सखी मंच व स्टार प्रवाह वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सखींना ‘दुहेरी’

‘वन मिनिट गेम शो’ मधून पैठणी जिंकण्याची संधीवर्धा : लोकमत सखी मंच व स्टार प्रवाह वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सखींना ‘दुहेरी’ मालिकेच्याकलाकारांसह दिलखुलास गप्पा मारण्याची व थेट भेट घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यावेळी वन मिनिट गेम शोच्या माध्यमातून सखींना पैठणी जिंकण्याची नामी संधी चालुन आली आहे. हा कार्यक्रम दि. २० जून ला सायंकाळी ५ वाजता, रंजन सभागृह, मातृसेवा संघ, वंजारी चौक, वर्धा येथे रंगणार आहे. यावेळी दुहेरी मालिकेचे कलाकार मालिकेचा खास भाग घेऊन येणार आहे. तसेच सखी मंच सदस्यांसोबत वन मिनिट गेम शोतून मनोरंजनाची धमाल रंगणार आहे. दुहेरी ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार ते शनिवार पर्यंत रात्री ८.३० वाजता प्रसारीत होत आहे. लहानपणापासूनच आपला भाऊराया आपल्या रक्षणासाठी पाठीशी उभा आहे, असे प्रत्येक बहिणीला वाटते; पण रक्षण करण्याची जबाबदारी फक्त भावाचीच आहे, असं नाही. किंबहुना वेळ पडली तर एक बहीण आपल्या बहिणीसाठी सर्वस्व पणाला लावू शकते, हाच विचार घेऊन स्टार प्रवाह सादर करीत आहे, एक नवा कौटुंबिक थरार ‘दुहेरी!’ ही कथा आहे, मैथिलीची. एका छोट्या गावात राहणारी तत्वनिष्ठ, प्रेमळ, साधी भोळी अशी मैथिली आपल्या बहिणीवर म्हणजे नेहावर जीवापाड प्रेम करते. नेहाच्या आनंदासाठी ती काहीही करू शकते. नेहाच्या रक्षणासाठी याच मैथिलीला बदलावी लागते तिची ओळख आणि ओलांडावी लागते गावाची वेस. ती नेमकं काय करते? पुढे काय घडतं या दोन बहिणींच्या आयुष्यात? याचा उलगडा या थरारक गोष्टीतून होईल.या मालिकेच्या कलाकारांसोबत धमाल करण्यासाठी सखी मंच सदस्यांनी कार्यक्रमाला येण्याचे विसरू नका. कार्यक्रमात वन मिनिट गेम शो, कलाकारांसह गप्पा-टप्पा, मनोरंजन तसेच पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. अधिक माहितीकरिता व नाव नोंदणीसाठी लोकमत कार्यालय, ठाकरे मार्केट, वर्धा येथे किंवा ९७६७७०४१२५ या क्रमांकावर संपर्क करावा.(उपक्रम प्रतिनिधी)