शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तहसील कार्यालयाला गळती

By admin | Updated: September 11, 2014 23:45 IST

तब्बल एक वर्षापासुन प्रलंबित असलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीचे अखेर लोकार्पण झाले. तालुक्याचे मुख्य कार्यालय म्हणुन तहसीलकडे पाहिले जाते. मात्र या नवीन इमारतीला सततधार

कारंजा(घा.) : तब्बल एक वर्षापासुन प्रलंबित असलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीचे अखेर लोकार्पण झाले. तालुक्याचे मुख्य कार्यालय म्हणुन तहसीलकडे पाहिले जाते. मात्र या नवीन इमारतीला सततधार पावसामुळे गळती लागली आहे. याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.या इमारतीचा लोकार्पणापुर्वी ताबा तहसीलदार बालपांडे यांनी घेतला तेव्हा इमारतीला गळती सुरु झाली होती. या इमारतीच्या छताला जागोजागी गळती लागली आहे. शिवात भिंतील ओल आले आहे. तीन लक्ष रुपये किमतीचा दरवाजा बसविलेला निवडणुक कक्ष असो वा प्रवेशव्दार. पोर्च, सभागृह येथेही पावसाचे पाणी टपकते. एकंदरीत या ईमारतीचे बांधकाम हे निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याची चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी नागरिकातून होत आहे. तालुक्यातील अन्य शासकीय बांधकामे ही दर्जाची होत नसल्याची नागरीकांत चर्चा आहे. त्याचेच हे ज्वलंत उदाहरण म्हणजे तहसील कार्यालयाची ईमारत आहे. या ईमारतीत येणारे यापेक्षा जुनीच ईमारत बरी होती असे म्हणतात. दोनदा थाटात लोकार्पन झालेल्या इमारतीच्या बांधकामाव्ह्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे. दोन कोटी रुपये खर्च करुन सुध्दा ईमारतीचे बांधकाम हे निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याने सदर काम हे कंत्राटदाराकडुन विनामुल्य करुन घेण्याची मागणी होत आहे. याबाबत १५ आॅगस्टला येथील तहसीलदार बालपांडे यांना नागरिकांनी विचारणा केली असता त्यांनी विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसावर आहे. तहसील कार्यालयातील निवडणुक कक्षात टपटप पाणी गळते. अशावेळेस निवडणुक सामग्री येथे सुरक्षित राहील काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देत योग्य कारवाईची मागणी आहे. कारवाईकडे नागरिकांचे लक्ष आहे.(शहर प्रतिनिधी)